अधिकाऱ्यांकडून कार्यवाही नाही : कोळसे-पाटील

By admin | Published: December 24, 2016 12:42 AM2016-12-24T00:42:40+5:302016-12-24T00:42:40+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक लढताना उमेदवारी अर्जासोबत शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली

No action taken by officials: Kols-Patil | अधिकाऱ्यांकडून कार्यवाही नाही : कोळसे-पाटील

अधिकाऱ्यांकडून कार्यवाही नाही : कोळसे-पाटील

Next

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक लढताना उमेदवारी अर्जासोबत शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती. याची तक्रार करूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही, अशी माहिती माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी दिली. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक अधिकाऱ्यांना यावर त्यांचे म्हणणे १६ जानेवारीपर्यंत मांडावे, अशी नोटीस बजावल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपूर येथील अ‍ॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस यांनी सादर शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली नाही. याविरोधात उके यांनी तक्रार केली होती.

Web Title: No action taken by officials: Kols-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.