‘टीपी’ योजनेशिवाय बांधकाम परवानगी नको

By admin | Published: November 24, 2014 11:50 PM2014-11-24T23:50:01+5:302014-11-24T23:50:01+5:30

शहराच्या जुन्या हद्दीचा प्रारूप आराखडा व समाविष्ट 23 गावांच्या विकास आराखडय़ातील शेती विभाग व मोकळ्या आरक्षणाच्या जागेवर नगररचना योजना (टीपी) राबविण्यात यावी,

No building permission is permitted under 'TP' scheme | ‘टीपी’ योजनेशिवाय बांधकाम परवानगी नको

‘टीपी’ योजनेशिवाय बांधकाम परवानगी नको

Next
पुणो : शहराच्या जुन्या हद्दीचा प्रारूप आराखडा व समाविष्ट 23 गावांच्या विकास आराखडय़ातील शेती विभाग व मोकळ्या आरक्षणाच्या जागेवर नगररचना योजना (टीपी) राबविण्यात यावी, त्याशिवाय बांधकामाला परवानगी देऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे आज केली. 
महापालिकेच्या प्रारूप आराखडय़ावरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या आराखडय़ात पाषाण, मुंढवा व संगमवाडी भागात सुमारे 7क्क् हेक्टरवर शेती झोनचे आरक्षण आहे. तसेच, समाविष्ट 23 गावांतील सुमारे 12क्क् ते 15क्क् एकर जमीन रिकामी आहे. त्याठिकाणी नगर रचना योजना (टीपी) राबविण्यात यावी. त्यामुळे शहराचा नियोजनबद्ध विकास होईल. शहर सुधारणा समितीने टीपीच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे टीपी योजनेच्या अंमलबजावणीसाठी या भागात बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोडके, प्रशांत बधे व अजय तायडे यांनी केली आहे.
 
पुणो शहर, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण जिल्ह्यात पुणो प्रादेशिक योजना (पीआरपी) राबविण्यास नोव्हेंबर 1997 ला मंजुरी मिळाली. मात्र, गेल्या 18 वर्षात पीआरपीमध्ये अनेक बदल करण्यात आले. सुमारे 66 हजार हेक्टर क्षेत्र निवासी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘पीआरपी’ योजनेचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक उज्‍जवल केसकर यांनी दिली.

 

Web Title: No building permission is permitted under 'TP' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.