राम मंदिरासाठी कॅश नको, चेक द्या; गोविंदगिरी महाराजांनी मुस्लीम संघटनांनी दिलेली कॅश नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:28 PM2021-02-06T15:28:46+5:302021-02-06T15:30:22+5:30

इंडियन मुस्लीम इन्टलेक्चुअल फोरम तर्फे राम मंदिराच्या निर्माणासाठी सव्वा लाखांचा निधी दान करण्यात आला..

No cash for Ram temple, give check; Govindgiri Maharaj rejected the cash given by Muslim organizations | राम मंदिरासाठी कॅश नको, चेक द्या; गोविंदगिरी महाराजांनी मुस्लीम संघटनांनी दिलेली कॅश नाकारली

राम मंदिरासाठी कॅश नको, चेक द्या; गोविंदगिरी महाराजांनी मुस्लीम संघटनांनी दिलेली कॅश नाकारली

googlenewsNext

पुणे : राम मंदिरासाठीमुस्लीम संघटनेने देवु केलेला सव्वा लाखांचा निधी राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी आज नाकारला. संघटनेनी रोख रक्कम दिल्याने ती नाकारत चेकने पैसे द्यावेत अशी विनंती त्यांनी केली. 

नवचैतन्य प्रकाशन आणि माईर्स एमआयटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत जोशी यांनी लिहलेल्या एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या विश्वधर्मी विश्वनाथतत्त्व या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष डॉ.गोविददेवगिरी महाराज , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी,  ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ.विजय भटकर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, शिवाजी महाराज मोरे, एस.एन.पठाण, एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, मंगेश कराड आदी उपस्थित होते. 

यावेळी इंडियन मुस्लीम इन्टलेक्चुअल फोरम तर्फे राम मंदिराच्या निर्माणासाठी सव्वा लाखांचा निधी दान करण्यात आला. या निधीची रक्कम इंडियन मुस्लिम इंटलेक्च्युअल फोरमचे एस.एन.पठाण यांच्या हस्ते गोविंद गिरी महाराज यांना सुपूर्द करण्यात आली.पण ही सगळी रक्कम रोख स्वरूपात असल्यामुळे ती रक्कम गोविंद महाराज यांनी तातडीने विश्वनाथ कराड यांच्याकडे परत केली. “माझ्याकडे अनेक मुस्लिम संघटनांनी यापूर्वी निधी सुपूर्द केला आहे. ही पहिलीच वेळ नाही. पण ही रक्कम रोख स्वरूपात असल्यास त्याचा हिशोब ठेवणं अडचणीचं होत आहे. त्यामुळे आतापर्यंत मी फक्त धनादेश स्वीकारलेले आहेत '' असे स्पष्टीकरण देखील गोविंदगिरी महाराजांनी यावेळी दिले.

दरम्यान, यापुर्वी देखील राममंदिर निर्माणासाठी अनेक मुस्लीम संघटनांतर्फे निधी दान करण्यात आला आहे. यामध्ये पुण्यातील विविध संघटनांचा समावेश आहे.

Web Title: No cash for Ram temple, give check; Govindgiri Maharaj rejected the cash given by Muslim organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.