हिताच्या निर्णयांत बदल नाही; अधिकाधिक पुणेकरांना पीएमपीकडे आकर्षित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:35 AM2018-02-13T03:35:00+5:302018-02-13T03:35:11+5:30
प्रशासनाने यापुर्वी घेतलेले निर्णय पीएमपी व प्रवासी हिताचे असतील तर त्यात बदल केला जाणार नाही. तसेच त्याबाबत सरसकट निर्णय न घेता प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे : प्रशासनाने यापुर्वी घेतलेले निर्णय पीएमपी व प्रवासी हिताचे असतील तर त्यात बदल केला जाणार नाही. तसेच त्याबाबत सरसकट निर्णय न घेता प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.
नयना गुंडे यांनी सोमवारी ‘पीएमपी’ची सुत्र हाती घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपली भुमिका स्पष्ट केली. तत्पुर्वी त्यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन पीएमपीच्या कामकाजाची प्राथमिक माहिती घेतली. ‘पीएमपी’च्या रुपाने गुंडे यांच्याकडे पहिल्यांदाच परिवहन क्षेत्राशी संबंधित जबाबदारी आली आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात पीएमपीच्या कामकाजाची माहिती, सद्यस्थितीचा आढावा, यापुर्वीचे निर्णय समजून घेण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी जाईल, असे गुंडे यांनी सांगितले.
सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे सांगून गुंडे म्हणाल्या, सुमारे १५ लाख प्रवासी मिळविण्याचे पीएमपीचे ध्येय आहे. त्यामुळे हे काम आव्हानात्मक असून थेट लोकांशी संबंध येत असल्याने काम करण्यास खुप वाव आहे.
अनेक देशांमध्ये तेथील मोठे अधिकारी, पदाधिकारीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करतात. पुण्यातही बसचा वापर वाढायला हवा. रस्त्यावरील गर्दी कमी व्हायला हवी. त्यासाठी प्रवासी संघटना
किंवा संबंधितांकडून चांगल्या
सुचना आल्या तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असे गुंडे यांनी नमुद केले.
महिला प्रवाशांना प्राधान्य
1 पुण्यामध्ये नोकरी करणाºया महिलांची संख्या खुप मोठी आहे.या महिलांना खुप तारेवरची कसरत करावी लागते. अनेक महिलांना घरापासून खुप लांबच्या ठिकाणी नोकरीसाठी जावे लागते. त्यामुळे त्यांसाठी विशेष बस आणि इतर सुविधा पुरविणे आवश्यक आहे.
2खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसेस आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरीक व विद्यार्थ्यांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असे नयना गुंडे यांनी सांगितले.
तुकाराम मुंढे यांच्या काही निर्णयांवर कर्मचारी तसेच प्रवासी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर बोलताना गुंढे म्हणाल्या, तुकाराम मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. प्रशासनामध्ये खुप काम केले आहे.
त्यावरच ते आणखी सक्षम होत जाईल. जे निर्णय प्रवासी आणि कंपनीच्या हिताचे असतील ते तसेच राहतील. कर्मचाºयांची बदली किंवा कारवाईबाबत आक्षेपांवर प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल.
सरसकट निर्णय घेतले जाणार नाहीत. कर्मचाºयांच्या सोयीचाही विचार करणे आवश्यक आहे. ते मानसिकदृष्ट्या शांत असतील तर कामाच्यादृष्टीने फायदेशीर होते. त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
वाहतूक हवी स्मार्ट
तंत्रज्ञानाचा वापर सर्वच ठिकाणी वाढत आहे. प्रवाशांना डोळ््यासमोर ठेवून बससेवा अधिक ‘स्मार्ट’ करण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी वेळेत सेवा पुरविणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केला जाईल, असेही गुंडे यांनी नमुद केले.