चित्रपट महामंडळातला अविश्वास ठराव बेकायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:09 AM2020-11-28T04:09:56+5:302020-11-28T04:09:56+5:30
मेघराज राजेभोसले यांचा आरोप : नोटीस न दिल्याचे अधोरेखित \Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चित्रपट महामंडळाच्या बैठकीत बेकायदेशीर आणि ...
मेघराज राजेभोसले यांचा आरोप : नोटीस न दिल्याचे अधोरेखित
\Sलोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चित्रपट महामंडळाच्या बैठकीत बेकायदेशीर आणि घटनाबाह्य रितीने अविश्वास ठराव आणण्यात आला. घटनेस अनुसरुन एकही गोष्ट कायद्याने न करता केवळ स्वार्थापोटी ही मंडळी एकत्र आली असल्याचा आरोप मेघराज राजेभोसले यांनी पत्राद्वारे केला आहे.
१० नोव्हेंबरपर्यंत संचालकांनी आपापल्या सूचना कळवण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर सुशांत शेलार यांनी १७ नोव्हेंबर रोजी बैठकीची नोटीस काढली. रणजित जाधव आणि धनाजी यमकर यांनी १९ नोव्हेंबरला आपल्या सूचना महामंडळाकडे सुपूर्त केल्या. त्यानंतर शेलार यांनी १९ तारखेला जुन्याच तारखेने पुन्हा नोटीस काढत जाधव, यमकर यांच्या सूचना अंतर्भूत केल्या. प्रत्यक्ष बैठकीत विचारविनिमय न करता गोंधळ घालून अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.
चित्रपट महामंडळाच्या घटनेत अविश्वास ठरावाची कोणतीही तरतूद नाही. नैसर्गिक न्यायाने संचालकांचा अविश्वास ठरावाचा हक्क मान्य केला तरीही अध्यक्षांना किमान ७ दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक होते. महाकलामंडल संस्थेलाही बहुतांश जणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मग आताच कांगावा का, करण्यात आला, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.