सभापती पोखरकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:17+5:302021-06-01T04:09:17+5:30

२४ मे ला सभापतीविरुद्ध शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप ...

No-confidence motion passed against Speaker Pokharkar | सभापती पोखरकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

सभापती पोखरकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

Next

२४ मे ला सभापतीविरुद्ध शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली. अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा असल्याने खेड पंचायत समिती परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे शहराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

या ठरावावर पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या वेळी त्यांनी सभागृहात अविश्वास ठराव मांडला. यावर आजी माजी सभापती, उपसभापती व सदस्यांनी मते मांडली. हात वर करून मतदान घेण्यात आले. ठरावाच्या बाजूने ११ जणांनी हात वर केले. भगवान पोखरकर, अमोल पवार, ज्योती आरगडे यांनी ठरावाच्या विरोधी मतदान केले.

शिवसेनेच्या सुनीता सांडभोर, वैशाली जाधव, सुभद्रा शिंदे, मच्छिंद्र गावडे, अमर कांबळे, अंकुश राक्षे आणि राष्ट्रवादीचे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे व भाजपाचे विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात सर्वपक्षीय १४ पैकी ११ जणांच्या वतीने दि २४ मे रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता व सदस्य राजकीय सहलीसाठी गेले होते. डोणजे येथील एका रिसोर्टमध्ये पंचायत समिती सदस्य मुक्कामी असलेल्या ठिकाणी सभापती पोखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन धिंगाणा घातला होता. या घटनेबाबत खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील व शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्याआरोपांची खैरात झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून खेड समिती पंचायत इमारतीसमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच सभापती भगवान पोखरकर यांना सभेत भाग घेण्यासाठी न्यायालयीन परवानगी मिळाली असल्याने पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना राजगुरुनगर येथे आणण्यात आले होते.

अटक असलेले शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांना पोलीस बंदोबस्तामध्ये अविश्वास ठराव सभेसाठी खेड पंचायत समितीमध्ये आणण्यात आले होते.

Web Title: No-confidence motion passed against Speaker Pokharkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.