आज कोव्हिशिल्ड लस नाही : केवळ कोव्हॅक्सिन लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:28+5:302021-08-12T04:13:28+5:30

पुणे : राज्य शासनाकडून ६ ऑगस्टपासून आजपर्यंत कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्याने आज (बुधवार, दि. ११ ऑगस्ट) शहरातील महापालिकेची ...

No covachield vaccine today: only covacin vaccine | आज कोव्हिशिल्ड लस नाही : केवळ कोव्हॅक्सिन लस

आज कोव्हिशिल्ड लस नाही : केवळ कोव्हॅक्सिन लस

googlenewsNext

पुणे : राज्य शासनाकडून ६ ऑगस्टपासून आजपर्यंत कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्याने आज (बुधवार, दि. ११ ऑगस्ट) शहरातील महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने आजही कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा करण्यात आला असून ससून रुग्णालयासह महापालिकेच्या पाच झोनमधील महापालिकेच्या ६ रुग्णालयांत प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे. उपलब्ध लसीपैकी २० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगद्वारे व २० टक्के लस ‘ऑन दी स्पॉट’ नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़ तर उर्वरित ४० टक्के लस ही (१४ जुलैपूर्वी व २८ दिवस पूर्ण झालेल्या) ऑनलाईन बुकिंगव्दारे व २० टक्के लस ही ‘ऑन स्पॉट’ म्हणून दुसरा डोस म्हणून दिली जाणार असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

Web Title: No covachield vaccine today: only covacin vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.