जोपर्यंत 'त्या' शिक्षकावर कारवाई नाही, तोपर्यंत मी कोविड चाचणी करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 09:33 PM2021-03-19T21:33:32+5:302021-03-19T21:33:57+5:30
गेल्या दीड वर्षापासुन छोट्या-मोठ्या कारणांवरून एक शिक्षक नाहक मानसिक त्रास देत असल्याची तक्रार महिला शिक्षिकेने हवेली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली आहे.
लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक शिक्षक गेले दीड वर्षापासुन छोट्या - मोठ्या कारणांवरून नाहक मानसिक त्रास देत असल्याची तक्रार त्याच शाळेतील महिला शिक्षिकेने हवेली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली आहे. त्रास देणाऱ्या शिक्षकाच्या विरोधात पुराव्यासह वारंवार तक्रारी केल्याचा दावा संबधित शिक्षिकेने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला दिलेल्या तक्रारीत केला आहे.
तक्रारकर्त्या शिक्षिकेने गेले ४ दिवसापासून सर्दी, अंगदुखी, ताप यासारखी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली आहेत. मात्र, वारंवार तक्रार करुनही संबधित शिक्षकावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ तक्रारकर्त्या महिला शिक्षिकेने, कोविडची चाचणी करण्यास अथवा उपचार घेण्यास नकार दिल्याने शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
ही महिला व पुरुष लोहगाव परिसरातील एका वस्ती शाळेवर मागील काही दीड वर्षापासुन शिक्षक म्हणुन काम करतात. मात्र गेले दीड वर्षापासुन शिक्षक हा छोट्या - छोट्या कारणावरुन कामात अडवणुक करण्याबरोबरच मानसिक त्रास देत असल्याचा आरोप शिक्षिकेने २० दिवसापुर्वी हवेली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रामदास वालझडे यांच्याकडे लेखी स्वरुपात केला आहे. मात्र, तक्रारीची चौकशी पूर्ण होऊन, संबधित शिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत कोविडची चाचणी करण्यास अथवा कोविडचा उपचार घेण्यास नकार दिल्याने, शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
या शिक्षकाने सर्व आरोप फेटाळुन लावले आहेत. अनेक वेळा शाळेत उशिरा आल्यानंतर, त्यांना सही करण्यास नकार दिल्यानेच त्यांनी माझ्याविरोधात खोट्या व बिनबुडाच्या तक्रारी केल्या आहेत. असे त्यांचे म्हणणे आहे.
रामदास वालझडे ( हवेली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी ) लोहगाव येथील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरुन, संबधित पुरुष शिक्षकाची चौकशी करण्यासाठी चार जणांची चौकशी समिती नेमली आहे. ही समिती पुढील ४८ तासात चौकषी अहवाल देणार आहे. हा चौकशी अहवाल वरीष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे.