भाजपच्या विरोधात सुृशिक्षित मतदारही राहिला नाही : पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:29 AM2020-12-11T04:29:27+5:302020-12-11T04:29:27+5:30
ते पंढरपूरहून आळंदी कडे जाताना काही वेळ उरुळी कांचन येथील मेमाणे फार्म येथे थांबले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते, ...
ते पंढरपूरहून आळंदी कडे जाताना काही वेळ उरुळी कांचन येथील मेमाणे फार्म येथे थांबले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते, ते पुढे बोलताना म्हणाले की मी १९९९ पासून मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या या भूमिकेचा आग्रह धरून मागणी करीत आहे पण ज्यांना ईव्हीएम मशीनमधील घोटाळ्यातून सत्तेवर यायचय ते लोक ही मागणी मान्य करीत नाहीत हे वास्तव आहे, "वन नेशन वन इलेक्शन" ही संकल्पना चांगली आहे पण ती मतपत्रिकेद्वारे राबवावी हा आग्रह असणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीबरोबरच नियमित कर्ज भरणाराना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली पण अद्याप ते दिले नाही या प्रश्नावर ते म्हणाले की सध्या कोरोनामुळे बाकी प्रक्रिया थोड्या थांबल्या आहेत पण लवकरच ते अनुदान दिले जावे यासाठी मी प्रयत्नशील आहे.