Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकर हत्येच्या तपासात प्रगती नाही, न्यायालयाने सीबीआयला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 03:40 PM2018-09-10T15:40:12+5:302018-09-10T15:53:48+5:30

Narendra Dabholkar Murder Case Update: दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात १० दिवसांच्या कोठडीतील तपासात प्रगती झाली नसल्याचे म्हणत न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे.

no investigations progress in Dabholkar's murder case : The court has convicted to CBI | Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकर हत्येच्या तपासात प्रगती नाही, न्यायालयाने सीबीआयला फटकारले

Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकर हत्येच्या तपासात प्रगती नाही, न्यायालयाने सीबीआयला फटकारले

Next
ठळक मुद्देशरद कळसकरच्या कोठडीत १५ सप्टेंबरपर्यत वाढ राजेश बंगेरा आणि अंमित दिगवेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

पुणे : सीबीआयच्या कोठडीत असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी राजेश बंगेरा याने सीबीआयच्या कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला़. या प्रकरणात १० दिवसांच्या कोठडीत तपासात प्रगती झाली नसल्याचे म्हणत न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे. कोठडीची मुदत संपत असल्याने राजेश बंगेरा अमित दिगवेकर आणि शरद कळसकर यांना सीबीआयने सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. यांनी बंगेरा आणि दिगवेकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर शरद कळसकर याच्या कोठडीत १५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. 
      तपासादरम्यान आरोपींकडे चौकशी करून झालेला तपास सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी केस डायरीच्या माध्यमातून न्यायालयासमोर सादर केला. त्यानुसार दिगवेकर आणि बांगेरा याला १४ तर कळसकर याला १७ सप्टेंबरपर्यंत कोठडी देण्याची मागणी केली. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बंगेरा आणि दिगवेकर याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अमोल काळे आणि कळसकर यांची एकत्रितपणे चौकशी करायची आहे. त्यामुळे त्यांच्याकडे चौकशी करायची ही एकच संधी सीबीआयला असल्याचा युक्तिवाद ढाकणे यांनी केला. 
बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल म्हणाले की, अमोल काळे यांच्याकडे देखील एसआयटीने सीबीआयच्या कोठडीत असताना चौकशी केली होती. बंगेरा याच्याकडे देखील एसआयटीने चौकशी केली. तसेच तपासी अधिकारी यांच्या समोरच त्याला मारहाण केली, ही बाब गंभीर आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही,असे मागील सुनावणी दरम्यान ढाकणे यांनी सांगितले व युक्तिवाद देखील केला नाही, मात्र याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या प्रतीमध्ये कुठेही नमूद करण्यात आलेले नाही की सरकारी वकिलाने न्यायालयात युक्तिवाद करू नये. त्यामुळे ढाकणे यांनी न्यायालयाची दिशाभूल केली आहे. त्यावर ढाकणे म्हणाले की, मारहाणीचा दावा केल्यानंतर बंगेरा याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी त्याने डॉक्टरांना हे सांगितले नाही़ तसेच रुग्णालयाच्या अहवालामध्ये त्याला जखम झाली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. 
बंगेराकडे पिस्तुलाचा परवाना 
महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे ६ ठिकाणी पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण राजेश बंगेरा याने दिले असून त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना आहे. या माध्यमातून त्याने आणखी काही पिस्तुल घेतले का याचा तपास सीबीआय करत असल्याचे सूत्रांनी सांगितले़. दरम्यान, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांना १७ सप्टेंबर रोजी कर्नाटकातील न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़.

Web Title: no investigations progress in Dabholkar's murder case : The court has convicted to CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.