मतदान प्रक्रियेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत :अण्णासाहेब घोलप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:20+5:302021-01-14T04:10:20+5:30
शुक्रवार दि. १५ जानेवारी रोजी पुरंदर तालुक्यातील ५५ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. त्या अनुषंगाने भोर उपविभागीय पोलीस ...
शुक्रवार दि. १५ जानेवारी रोजी पुरंदर तालुक्यातील ५५ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. त्या अनुषंगाने भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह तालुक्याच्या विविध भागात पोलीस संचलन केले. यामध्ये पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्यासह वरिष्ठ सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने, सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत माळी, महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे त्याच प्रमाणे सहायक पोलीस उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी, होमगार्ड जवान आदी सुमारे ९० जवान सहभागी झाले होते. तालुक्यातील गराडे, वाघापूर, गुरोळी, दिवे, जाधववाडी यासह विविध भागात संचलन करून मतदारांना निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करण्यात आले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना सूचना करताना पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप. यावेळी पोलीस अधिकारी राजेश माने, राहुल घुगे, श्रीकांत माळी, सुप्रिया दुरंदे आणि पोलीस आणि होमगार्ड जवान.