"होश मे आओ होश मे आओ ममताजी होश मे आओ ", घोषणाबाजी देत ममता बॅनर्जींच्या विरोधात पुण्यात भाजपचे पदाधिकारी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 01:38 PM2021-05-05T13:38:55+5:302021-05-05T14:00:19+5:30
पुणे स्टेशन येथे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
पुणे: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. काहींचे खूनही करण्यात आले. भाजप कार्यालये फोडली गेली. त्यामुळे देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अनेक राज्यात भाजपकडून आंदोलन केले जात आहे. पुण्यातही अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन येथे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नही चलेगी नही चलेगी दादाशाही नही चलेगी अशा घोषणा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या आहेत.
जगदीश मुळीक म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विजयी झाल्यानंतर हे कुठल्या प्रकारचे सेलिब्रेशन साजरे केले जात आहे. त्याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत. अनेकांची घरेही जाळण्यात आली आहेत. भाजपच्या कार्यालयांची तोडफोड केली जात आहे. प्रचंड मोठया प्रमाणात हिंसाचार बंगाल मध्ये चालू आहे. भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली जात आहे. हा ममता बॅनर्जींनी केलेला लोकशाहीचा खून आहे. आमचे कार्यकर्ते हे कदापी सहन करू शकत नाही. अशा पद्धतीचे राज्य चालत असेल. तर यामध्ये भाजप लढण्यासाठी आघाडीवर राहिली आहे. असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होयला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
हा हिंसाचार त्वरित थांबला पाहिजे अन्यथा भाजपचे कार्यकर्ते अजिबात शांत बसणार नाहीत. यापेक्षा उग्र आंदोलनाच्या भूमिकेत ते असतील. राज्य आणि देशातील विरोधी पक्षांना आमचा प्रश्न आहे. कि इतर वेळेला कुठं अशी घटना घडली कि सर्व बाहेर येतात मेणबत्त्या पेटवतात. ते सर्व कुठं लपून बसले आहेत. आज तुमच्या मेणबत्त्या कुठं आहेत. अनेक भाजप कार्यकर्त्यानाचे खून होत आहेत. लोकशाहीचा खून झाला आहे. या घटनेच्या विरुद्ध सर्वानी एकत्र यावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.