..तर जमिनीचे वाटप नाही
By admin | Published: March 26, 2017 01:14 AM2017-03-26T01:14:27+5:302017-03-26T01:14:27+5:30
दौंड तालुक्यातील भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना पाणी मिळाल्याशिवाय जमिनीचे वाटप होऊ देणार नाही, असे आमदार
पाटेठाण : दौंड तालुक्यातील भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना पाणी मिळाल्याशिवाय जमिनीचे वाटप होऊ देणार नाही, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मदत व विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार कुल भूमिका मांडताना बोलत होते.
वडगाव बांडे येथील जमिनी भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना वाटण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु, त्या ठिकाणच्या पाणीवाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. वडगाव बांडे हे गाव भामा आसखेड लाभक्षेत्रातून वगळण्याची प्रक्रिया शासन दरबारी सुरू आहे. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता, सभागृहात अनेक वेळा ठोस भूमिका मांडली होती, परंतु शासनाकडून अद्याप कोणताच प्रतिसाद दिला जात नाही.
बैठकीला पुण्याचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी रमेश काळे, पुनर्वसन उपायुक्त दीपक नलावडे, राहुल कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, संजय आसवले, मोसमी बर्डे उपस्थित होते. पुढील आठवड्यात महसूल व जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक महसूल व पुनर्वसन मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे हा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मदत व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडून देण्यात आले आहे. (वार्ताहर)
शासनस्तर बेकायदेशीर प्रक्रिया सुरू
४गुंजवणी प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांनादेखील वडगाव बांडे येथे जमिनी वाटप करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, या गावाचा व गुंजवणी प्रकल्पाचा दुरान्वयेही संबंध नसल्याने तसेच भामा आसखेड प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असून त्याबाबतचा अंतिम निर्णय झाला नाही. ही जमीन या जिल्हा पूलचा भाग होऊ शकत नाही व जिल्हा पूलचा भाग झाल्याशिवाय जमीन कायदेशीरपणे इतर प्रकल्पास देणे शक्य नासतानाही शासन स्तरावर बेकायदेशीरपणे सुरु असलेली प्रक्रिया थांबवण्यासाठी मागणी आमदार राहुल कुल यांनी या वेळी केली आहे.