Coronavirus Pune Lockdown: लॉकडाऊन टळला; पण पीएमपी, हॉटेल, सिनेमागृह, मॉलबाबत कडक निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 01:44 PM2021-04-02T13:44:22+5:302021-04-02T14:01:53+5:30

Coronavirus Pune Lockdown: येत्या काही दिवसात ९ हजार रुग्ण सापडू शकतात..

No lockdown; But PMP, hotels, malls closed cinemas; Administration | Coronavirus Pune Lockdown: लॉकडाऊन टळला; पण पीएमपी, हॉटेल, सिनेमागृह, मॉलबाबत कडक निर्बंध

Coronavirus Pune Lockdown: लॉकडाऊन टळला; पण पीएमपी, हॉटेल, सिनेमागृह, मॉलबाबत कडक निर्बंध

googlenewsNext

पुणे : पुणे शहरांमध्ये लॅाकडाउन टळला असला तरी अधिकचे निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये दिवसाकाठी ९ हजार रुग्ण सापडु शकतात. त्यामुळे निर्बंध आवश्यक असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

नव्या नियमावलीनुसार ६ ते ६ पर्यंत शहरात पूर्णपणे बंद रेस्टॅारंट आणि बार पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. तसेच पीएमपी, मॅाल,, आठवडी बाजार हे ७ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न आणि अंत्यसंस्कार याशिवाय कोणत्याही सामाजिक , सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांना बंदी. लग्नाला ५० आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहु शकतात. 

नव्या निर्बंधांबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले ,” लोकांना त्रास होवु नये म्हणून मध्यम मार्ग स्विकारण्याचा प्रयत्न केला आहे. मायक्रो कंटेनमेंट झोन मध्ये मोठ्या प्रमाणावर नियम कडक करणार. होम आयसोलेशन मधील रुग्णांच्या तपासणीवर भर देण्यात येणार आहे. त्यांची ब्लड टेस्ट करुन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल” 

रुग्णालयांच्या बीलांचे ॲाडिट पुन्हा सुरु केले जाईल. 

याबरोबरच  विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव म्हणाले “ पॅाझिटिव्हीटी २७% वरुन ३२% वर गेला आहे. आठवड्याचा ग्रोथ रेट हाच राहिला तर दिवसाला ९ हजार रुग्ण सापडतील. हॅास्पिटल बेंड संदर्भात काल बैठक झाली.काही रुग्णालय १००% कोव्हीड हॅास्पीटल करण्याची वेळ येवु शकते.” 

एसटी सेवेवर कोणतेही बंधने नाही. 
पुण्याचे सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, पोलिसांना अंमलबजावणी करणं सोपं व्हावे यादृष्टीने पावले उचलली जातील. आता चेक पोस्ट पेट्रोलिंग सुरु करणार आहोत. मात्र त्याचबरोबर नागरिकांमध्ये प्रबोधनाची आवश्यकता आहे. 

खासगी कार्यालयांवर काही बंदी नाही. आधी प्रमाणेच सुरु राहणार असून  शाळा, कॉलेज बंद राहणार आहे. 
पुण्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी राहणार आहे. 

शहरातील हॉटेलमध्ये सायंकाळी ६ पर्यंत अन्न पदार्थ मिळतील पण त्यानंतर अँपद्वारे ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहे.

सातारा सांगली कोल्हापुर मध्ये देखील रुग्णवाढ होत आहे त्यामुळे ते रुग्ण पुण्यात यायला लागुन आरोग्य यंत्रणेवर ताण येईल. लसीकरणाबाबत बोलताना राव म्हणाले “ पुण्यात सर्वात जास्त लसीकरण सुरु आहे. शंभर दिवसात लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन १०० डेज

Read in English

Web Title: No lockdown; But PMP, hotels, malls closed cinemas; Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.