औंध जिल्हा रुग्णालयात वर्षभरात एकही नाही माता मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:14+5:302021-02-17T04:15:14+5:30
सामान्य रुग्णांमध्ये गर्भावस्था आणि प्रसूतिबाबत जनजागृती वाढत आहे. औंध जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक प्रसूती एप्रिल महिन्यात तर सर्वात कमी ...
सामान्य रुग्णांमध्ये गर्भावस्था आणि प्रसूतिबाबत जनजागृती वाढत आहे. औंध जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक प्रसूती एप्रिल महिन्यात तर सर्वात कमी प्रसूती आॅगस्ट महिन्यात झाल्या. आॅगस्टमध्ये २, सप्टेंबरमध्ये २, आॅक्टोबरमध्ये ४ कोरोनाग्रस्त महिलांची नॉर्मल प्रसूती करण्यात आली.
रुग्णालयांमधील प्रसूती कक्ष आणि आॅपरेशन थिएटरची गुणवत्ता वाढवण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे ‘लक्ष्य’ या कार्यक्रमाची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालये, मेडिकल कॉलेज रुग्णालये, सामूहिक स्वास्थ्य केंद्रे या ठिकाणी अभियान कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळेही मातामृत्यू रोखण्यात यश मिळाल्याची माहिती प्रसूती विभाग प्रमुख डॉ. नीलम दीक्षित यांनी दिली. क्लिनिकल प्रोटोकॉल, प्रशिक्षण, सुविधा यावरही भर दिला आहे. गर्भावस्थेचे निदान झाल्यापासूनच रक्ततपासणी, सोनोग्राफी अशा सर्व तपासण्या नियमित केल्या जातात. चाचण्यांमधून आरोग्याबाबतची गुंतागुंत लवकर लक्षात आल्याने त्यादृष्टीने उपचारांवर भर देता येतो. आरोग्य शिक्षणावर भर हाही महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------------
महिनानॉर्मल सिझेरियन एकूण प्रसूती
जानेवारी ६१ २५ ८६
फेब्रुवारी ६१ ३४ ९५
मार्च ५९ ३८ ९७
एप्रिल ६१ ४४ १०५
मे ३९ २० ५९
जून ५३ २३ ७६
जुलै ४२ ०७ ४९
आॅगस्ट १५ ०१ १६
सप्टेंबर ३९ ०१ ४०
आॅक्टोबर ४६ १२ ५८
नोव्हेंबर ६० १२ ७२
डिसेंबर ७७ २७ १०४
---------------------
आरोग्याबाबत सामान्यांमध्ये ब-यापैकी जनजागृती झाली आहे. गुंतागुंत टाळण्यासाठी नियमित तपासण्यांवर भर दिला जातो. गर्भवती महिलांसाठी वाहनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘हाय रिस्क’ केस असल्यास योग्य ठिकाणी रेफर केल्याने संभाव्य धोका टाळता येतो.
- डॉ. नीलम दीक्षित, स्त्री रोगविभाग प्रमुख, औंध जिल्हा रुग्णालय