विकल्प निवडण्यासाठी एमपीएससीची नाही लिंक खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:46+5:302021-09-18T04:12:46+5:30
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुख्य परीक्षेमधून विविध पदांसाठी पसंतीक्रम सादर करण्यासाठी १२ ते २३ ऑगस्ट या दरम्यान मुदत ...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुख्य परीक्षेमधून विविध पदांसाठी पसंतीक्रम सादर करण्यासाठी १२ ते २३ ऑगस्ट या दरम्यान मुदत दिली होती. मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल ६ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर केला होता. यामधून भरावयाच्या विविध संवर्गासाठी पसंतीक्रम देण्यास इच्छुक नसणाऱ्या उमेदवारांना ‘नाही’ हा विकल्प निवडण्यासाठी लिंक खुली केली आहे. ही लिंक २० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
मुलाखत दिलेल्या उमेदवारांची अन्य पदावर निवड झाल्याचे निवेदन आयोगाकडे प्राप्त झाले आहे. यापूर्वी विविध पदांसाठी पसंतीक्रम सादर केलेल्या व पदांचे पसंतीक्रम सादर न केलेल्या उमेदवारांना परीक्षेमधून भरावयाच्या कोणत्याही पदांसाठी पसंतीक्रम नाही असा विकल्प निवडण्यासाठी पुन्हा लिंक खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.