आता नवीन रेशन कार्डसाठी जातीच्या दाखल्याची नाही गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 12:41 PM2021-12-03T12:41:25+5:302021-12-03T12:42:27+5:30

पुणे : देशातील गरिबांसाठी प्रमुख आधार असलेले रेशन कार्ड तयार करण्याच्या नियमांत बदल झाले आहेत. रेशन कार्ड तयार करायचे ...

No need for caste certificate for new ration card | आता नवीन रेशन कार्डसाठी जातीच्या दाखल्याची नाही गरज

आता नवीन रेशन कार्डसाठी जातीच्या दाखल्याची नाही गरज

googlenewsNext

पुणे : देशातील गरिबांसाठी प्रमुख आधार असलेले रेशन कार्ड तयार करण्याच्या नियमांत बदल झाले आहेत. रेशन कार्ड तयार करायचे असेल तर काही नियमात बदल केले आहेत. मात्र, आता नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर जातीच्या प्रमाणपत्राची काहीही गरज नाही. प्राधान्य आणि अंत्योदय योजनेअंतर्गत अनुक्रमे २४ लाख ९१ हजार ८५१ आणि २ लाख १९ हजार ३०८ लाभार्थी आहेत. त्यांना सध्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळत आहे.

रेशन कार्ड ओळखपत्र आणि पत्ता पुरावा म्हणून देखील वापरता येते. रेशन कार्ड हा प्रत्येकाच्या ओळखीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. नवीन गॅस कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक खाते उघडणे, सिम कार्ड मिळवणे ते मतदार ओळखपत्रासाठी या रेशन कार्डचा वापर होत असतो.

नव्या रेशन कार्डासाठी कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट साइज फोटो, जुने रेशन कार्ड असेल तर ते रद्द झाल्याचे प्रमाणपत्र, कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, कुटुंबप्रमुखाच्या नावावर असलेल्या गॅस पासबुकची झेरॉक्स, संपूर्ण कुटुंबाच्या आधार कार्डची झेरॉक्स, सदस्यांचा जन्माचा दाखला, उत्पन्नाच्या दाखला, लाइट बिल, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

* जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्वस्त धान्य एकूण दुकाने - १८२३

* पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य एकूण दुकाने - ७२४

* जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण शिधापत्रिकाधारक - २७,११,१५९

* पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण शिधापत्रिकाधारक - १०,२६,०००

अंत्योदय योजना - ८,१७७

प्राधान्य कुटुंब - ३,२२,०००

रेशन कार्ड तयार करायचे असेल तर काही नियमांत बदल केले आहेत. मात्र, त्यामध्ये जातीचा दाखला जोडावा लागणार अशी काही अट टाकलेली नाही. त्यामुळे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीचा दाखला द्यावा लागणार यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: No need for caste certificate for new ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.