वारस नोंद व अन्य नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:37 AM2020-11-22T09:37:41+5:302020-11-22T09:37:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नागरिकांना अनेक लहान-लहान कामासाठी तलाठी, तहसिलदार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांचा हा त्रास कमी ...

No need to go to Talathi office for heir registration and other registration | वारस नोंद व अन्य नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

वारस नोंद व अन्य नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नागरिकांना अनेक लहान-लहान कामासाठी तलाठी, तहसिलदार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी शासनाने वारस नोंदीसह अन्य कोणत्याही नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे जिल्ह्यात एक महिन्यात सुमारे 1100 नोंदी या ऑनलाईन अर्जद्वारे करण्यात आल्या आहेत.

जमिनीवर कर्जाचा बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुम) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा महसुल विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली असून, महाभूमि या संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. यासुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचला असून ,

महसूल विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या आहेत. डिजिटल सातबारा उतारा, ई फेरफार अशा प्रमुख सुविधांचा यामध्ये समावेश आहे. करोनाच्या काळात ऑनलाईन सुविधेचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. नागरिकांना सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाऊ लागू नये, यासाठी डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिला आहे. आता याच्या पुढील पाऊल म्हणजे कोणत्याही कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, अशी शासनाची भूमिका आहे. त्यानुसार शासनाने वारसनोंद, कर्जाचा बोजा दाखल करणे आदी नोंदींसाठी ई हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. मयत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसाची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभुमि या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जाची ऑनलाईन पडताळणी करतील. कागदपत्रे अपूर्ण असेल तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल. सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर तलाठी त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणार आहे.

अनेक शेतकरी शेतीपीक अथवा उद्योग व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेतात. कर्ज घेतल्यानंतर संबंधित कर्जदाराच्या जमिनींवर बोजा चढविणे अथवा कर्ज फेडल्यानंतर तो बोजा काढून घेण्यासाठी बँका व कर्जदार यांना त्रास सहन करावा लागतो. "इ- हक्क'''''''' ही प्रणाली देखील बँकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर बोजा टाकणे अथवा काढण्यासाठी बँकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात त्यांची नोंद घेतली जाणार आहे.

Web Title: No need to go to Talathi office for heir registration and other registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.