२३ गावांचा विकास करताना जुन्या चुका नको; अन्यथा रास्ता रोको करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:46+5:302021-01-18T04:10:46+5:30
फुरसुंगी : पुणे महापालिकेने समाविष्ट केलेल्या ११ गावांमध्ये कर आकारणी करताना ज्या चुका झाल्या. जो जाचक कर आकारला गेला, ...
फुरसुंगी : पुणे महापालिकेने समाविष्ट केलेल्या ११ गावांमध्ये कर आकारणी करताना ज्या चुका झाल्या. जो जाचक कर आकारला गेला, त्याच चुका नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमध्ये होऊ नये याला विरोध करण्यासाठी पालिकेचा कचरा डेपो बंद करून रस्ता रोको आंदोलन करण्याचा सासवड रस्त्यावरील सोनाई गार्डनमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ३४ गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पूर्वी ११ गावे महापालिकेत समाविष्ट केली. मात्र तेथे सोईसुविधांचा अभाव आहे. त्याचप्रमाणे कर आकारणी ही भरमसाठ असल्याने येथील ग्रामस्थांना त्याचा फटका बसत आहे. ही जाचक कर आकारणी नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांसाठीही राहील. याला विरोध करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज नियोजन बैठक घेण्यात आली.
११ गावाच्या कर आकारणी या बैठकीसाठी उरुळी देवाची गावचे माऊली भाडळे, उल्हास शेवाळे, संजय भाडळे, दिलीप भाडळे, शंकर भाडळे, रमेश भाडळे, फुरसुंगी गावचे अप्पा खुटवड नगरसेवक गणेश ढोरे, धनंजय कामठे, शेवाळेवाडी गावचे विक्रम शेवाळे, उंड्रीगावचे सचिन घुले ,राजेंद्र भिंताडे, पिसोळी गावचे मच्छिंद्र दगडे, नवनाथ मासाळ, होळकरवाडी गावचे रवींद्र झांबरे, राकेश झांबरे, हांडेवाडी गावचे शिवाजी हांडे, गोविंद औताडे, वडाची वाडीचे दत्तोबा बांदल व इतर गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो : पुणे महापालिकेने २३ गावांचा विकास करताना जुन्या चुका करू नये. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.