हाेर्डिंग लावल्याने तिकीट मिळत नाही ; मुख्यमंत्र्यांचा नेत्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:12 PM2019-09-15T12:12:27+5:302019-09-15T12:28:31+5:30
मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी पुण्यात माेठमाेठाले हाेर्डिंग लावण्यात आले हाेते. असे हाेर्डिंग लावणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्प्ष्ट केले.
पुणे : मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा काल पुण्यात संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे शहरभर हाेर्डिंग लावण्यात आले हाेते. संपूर्ण शहर भाजपमय झालं हाेतं. त्यात अनेक हाेर्डिंग आणि फ्लेक्स हे अनधिकृत हाेते. याबाबत पत्रकारांनी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता अशाप्रकारे हाेर्डिंग लावणे चुकीचे असून हाेर्डिंग लावल्याने काेणालाही तिकीट मिळत नाही तर काम पाहूनच तिकीट देणार असल्याचा सूचक इशारा मुख्यमंत्र्यानी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल शहरात झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा ही पुण्यातील आठही विधानसभा मतदार संघामधून निघाली. या सर्व मतदार संघामध्ये माेठ्याप्रमाणावर हाेर्डिंग लावण्यात आले हाेते. माेठ माेठ्या हाेर्डिंग आणि फ्लेक्समुळे सर्व रस्ते व्यापले हाेते. एकही विजेचा खांब किंवा हाेर्डिंगचे ठिकाण यात साेडण्यात आले नव्हते. प्रत्येक मतदार संघामधील आमदारांनी आणि निवडणुकीसाठी तिकीट मिळावे अशी इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले हाेते. काही ठिकाणी भले माेठे हार क्रेनच्या सहाय्याने लटकविण्यात आले हाेते. तसेच मुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला. यातून मुख्यंमंत्री तिकीटासाठी आपला विचार करतील अशी इच्छुकांची अपेक्षा हाेती. या सर्व इच्छुकांना मुख्यमंत्र्यांनी आज सुचक इशारा दिला. हाेर्डिंग लावल्याने काेणालाही तिकीट मिळणार नाही तर काम पाहूनच तिकीट देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच अनधिकृत हाेर्डिंग लावणाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यातील महाजनादेश यात्रा ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा आली. ट्रफिकच्या वेळेला ही यात्रा शहरात दाखल झाल्याने माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी झाली. त्यामुळे मुख्यंमत्र्यांनी याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. तसेच पुणेकरांनी या यात्रेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांनी पुणेकरांचे आभार देखील मानले.