कोरोनाचे औचित्य साधून नुसता पुणे शहराचा विकास आराखडा करून चालणार नाही : डॉ. प्रताप रावळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:12 PM2020-05-25T13:12:41+5:302020-05-25T13:40:49+5:30

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील झोपडपट्या व झोपडपट्टीसदृश्य घरांतून कोरोनाला बाहेर काढणे कठीण झाले आहे.

No only pune city devlopment plan improvement on corona occasion : Dr. Pratap Raval | कोरोनाचे औचित्य साधून नुसता पुणे शहराचा विकास आराखडा करून चालणार नाही : डॉ. प्रताप रावळ

कोरोनाचे औचित्य साधून नुसता पुणे शहराचा विकास आराखडा करून चालणार नाही : डॉ. प्रताप रावळ

Next
ठळक मुद्देसार्वजनिक आरोग्य व नगररचनेचा मेळ घालावा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कशा प्रकारची नगररचना असली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न निर्माण

* सार्वजनिक आरोग्य व नगररचनेचे महत्व काय आहे?
 - इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की आतापर्यंत जे आजार, रोगराई किंवा विषाणु पसरले, त्यात शहरे अग्रस्थानी राहिली आहेत. चौदाव्या व एकोणीसाव्या शतकात भारतासह युरोप व जगातील विविध देशांत विविध आजारांनी थैमान घातले होते. या आजारांचे उगमस्थान दाटावाटीने घरे असलेल्या वस्त्या होते. अशा वस्त्यांमध्ये सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नव्हती. मृतांचा आकडा वाढल्याने राज्यकर्त्यांना जाग आली व सार्वजनिक आरोग्य, स्वच्छतेबाबत ध्येय धोरणे आखणे भाग पडले. घरांच्या रचना बदलण्यात आल्या. रुंद रस्ते, मोकळ्या जागा व उद्याने निर्माण होऊ लागल्याने नगररचनेचे महत्व अधोरेखित झाले. सार्वजनिक आरोग्य व नगररचना यांचा मेळ घातला गेला. नगररचनेचे प्रयोग दीर्घकालीन आजार, नैसर्गिक आपत्ती आणि असुरक्षितता हे डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आले.


-------
* पुणे शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागाची स्थिती कशी आहे?
- पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील झोपडपट्या व झोपडपट्टीसदृश्य घरांतून कोरोनाला बाहेर काढणे कठीण झाले आहे. कसबा पेठ, भवानी पेठ, गंजपेठ, मोमिनपुरा येथील लोकसंख्येचा विचार केला तर त्याला झोपडपट्टी की कोंडवाडे म्हणायचे, असा प्रश्न पडतो. २०११ मध्ये आम्ही केलेल्या कसबा पेठेच्या अभ्यासात या भागात लोकसंख्या १०५० प्रति हेक्टर एवढी होती. तसेच झोपडपट्टीतील लोकसंख्या ६९०० एवढी आढळून आली. आपण शहरातील झोपडपट्ट्या व झोपडपट्टीसदृश्य भाग सुटसुटीत राहण्याजोगा करण्यास अपयशी ठरलो आहोत.
--------------

* विकास आराखडा व नगररचनेचा मेळ घातला जातो का?
- पुणे शहराचा पसारा आता खुप वाढला आहे. तो आणखी वाढविण्याचा अट्टाहास आता शासन व राजकीय शक्तींनी थांबवायला हवा. आपण शहराची क्षमता गमावून बसलो आहे. महापालिकेने बनविलेल्या जुन्या हद्दीच्या शहर विकास आराखड्यात (२००७-२७) ३३ लाख लोकसंख्या अपेक्षित ठेऊन प्रयोजन केले आहे. या आराखड्याचे सखोल मुल्यमापन करणे गरजेचे आहे. २००१ च्या जनगणनेनुसार १०४१२ प्रति चौरस किमी एवढी लोकसंख्येची घनता नमुद करण्यात आली आहे. विकास आराखड्यानुसार लोकसंख्येची घनता २२८३० चौ.किमी. एवढी होईल. दुपटीहून अधिक लोकांसाठी उद्याने, करमणुकीसाठी मोकळ्या जागा व इतर सोयीसुविधा उपलब्ध होतील का, हा प्रश्नच आहे. आता कोरोनाचे औचित्य साधून नुसता विकास आराखडा करून चालणार नाही.
----------
* शहराची रचना कशी बदलता येईल?
उत्तर : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कशा प्रकारची नगररचना असली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानिमित्ताने नगररचनाकारांसह संशोधकांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे. अशा संकटाशी सामना करण्यासाठी सुबक, सुटसुटीत, राहण्याजोगी नगररचना कामात येते हे इतिहासाने दाखवून दिले आहे. त्यासाठी नगर नुतणीकरणासारखी योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट, झोपडपट्या व झोपडपट्टीसदृष्य भागात एसआरएच्या माध्यमातून झोपडपट्यांचे पुनर्विकास व पुर्नवसन हे शहराच्या मुलभूत गरजा व सेवा प्रकल्प राबवून करावे लागेल. या योजनांसह विकास आराखड्याची काटेकोर अंमबजावणी व्हायला हवी. शहरात नगररचनाकार, नियोजनकार व अभ्यासकांची सुकाणु समिती स्थापन करावी. शासकीय, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक संस्थांच्या सहभागातून नाविण्यपुर्ण पुणे शहराची रचना व संकल्पना अंमलात येण्यासाठी आता कृती करणे आवश्यक आहे. भविष्यात कोरोना विषाणुसारखे साथीचे आजार आले तर परत दाटीवाटीच्या वस्त्याच लागण होण्यास अग्रस्थानी असतील, यात शंका नाही, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: No only pune city devlopment plan improvement on corona occasion : Dr. Pratap Raval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.