नो-पार्किंगचे फलक देखावाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:40 AM2017-08-05T03:40:33+5:302017-08-05T03:40:33+5:30

मोठ्या वर्दळीच्या हडपसर-सासवड मार्गावर भेकराईनगर बसस्थानकासमोर नो-पार्किंगच्या फलकांसमोरच अवजड व इतर वाहने पार्क करत असूनही हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीत.

 No-parking pane visible! | नो-पार्किंगचे फलक देखावाच!

नो-पार्किंगचे फलक देखावाच!

Next

फुरसुंगी : मोठ्या वर्दळीच्या हडपसर-सासवड मार्गावर भेकराईनगर बसस्थानकासमोर नो-पार्किंगच्या फलकांसमोरच अवजड व इतर वाहने पार्क करत असूनही हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी दररोजच वाहतूककोंडी व अपघात घडत असताना वाहतूक पोलीस मात्र दुसरीकडे दुचाकी व चारचाकी अडवण्यातच व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नो-पार्किंगच्या फलकासमोर वाहने लावणाºया या मुजोर वाहनचालकांवर कोण कारवाई करणार, असा सवाल नागरिकांना पडला आहे.
हडपसर-सासवड मार्गावर सातववाडी, गोंधळेनगर, भेकराईनगर, तुकाईदर्शन आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर जागोजागी नो-पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र या फलकांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. कारण नो-पार्किंगमध्ये गाड्या लावणाºयांवर हडपसर वाहतूक पोलिसांकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. कारवाई ही केवळ रस्त्यावरून जाणाºया वाहनांना अडवूनच केली जाते. त्यामुळे नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करूनही हे बेशिस्त वाहनचालक अगदी बिनधास्त असतात. पोलिसांचा कोणताच धाक अथवा दंडाची भीती त्यांना नसते. त्यामुळे या मार्गावरील, हॉटेल, हॉस्पिटल, बँक, शाळा इतर व्यावसायिकांनी कोणतीही स्वतंत्र पार्किंगची सोय केली नसल्याने या ठिकाणी येणारे ग्राहक भर रस्त्यातच वाहने पार्क करत असल्याने रस्ता अरुंद होऊन पादचारी व ज्येष्ठ नागरिकांना तर रस्त्यावरून चालणेही धोक्याचे झाले आहे. या मार्गावरील सर्व बस थांब्यांवर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून स्वत:ची दुकाने थाटलेली आहेत. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर भर उन्हापावसात उभे राहतात. या व्यावसायिकांवरही कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे
नो- पार्किंगचे फलक केवळ देखावाच ठरत आहेत.
या मार्गावर तुकाईदर्शन चौक, भेकराईनगर चौक, बसस्थानकासमोर दररोज तासन्तास कोंडीमुळे नागरिक हैराण झालेले असताना यासाठी कारणीभूत असणाºयांवर कारवाईस वाहतूक पोलीस व संबंधित प्रशासन का धजवत नाही? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
हडपसर वाहतूक पोलीस व संबंधित प्रशासनाने रस्त्यात अतिक्रमण करणारे व नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

Web Title:  No-parking pane visible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.