शहरात काही भागांत नो-पार्किंग, एकेरी वाहतूक
By admin | Published: May 1, 2016 03:04 AM2016-05-01T03:04:01+5:302016-05-01T03:04:01+5:30
पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी शहरातील काही ठिकाणी नो-पार्किंग करण्यात आले आहे. पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी
पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी शहरातील काही ठिकाणी नो-पार्किंग करण्यात आले आहे.
पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील येरवडा ते खराडी जुना जकात नाका, पुणे मनपा हद्दीपर्यंत बी. आर.टी.मार्गावर फक्त पी.एम. पी. बसेस धावतील, अन्य पर्याय उपलब्ध नसतील त्या वेळी अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका या शिवाय इतर कोणतेही वाहन चालविण्यास अथवा पार्किंग बंदी करण्यात आली आहे. कोंढवा वाहतूक विभागांतर्गत शीतल पेट्रोल पंपाच्या उजव्या बाजूने अशोका म्यूज सोसायटी ते क्लासिक क्युबा सोसायटीपर्यंतच्या रोडवर मुख्य रस्त्यापासून आत जाण्यास एकेरी वाहतूक करण्यात येत आहे.
शितल पेट्रोल पंपाच्या मागील रोडवरील बादशहा अपार्टमेंट ते आशिर्वाद बिल्डींगपर्यत मुख्य रस्त्याकडे येण्यास एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. येरवडा वाहतूक विभागातर्गंत झेन्सार सर्कल चौकाकडून रॅडीसन हॉटेल चौकात आल्यानंतर चंदननगरकडे जाण्यास, उजवीकडे खराडी बायपास कडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून मुख्य खराडी बायपास रस्त्यावर डावीकडे वळण घेण्यास परवानगी दिली आहे.