नारायणगावला ‘नो पार्किंग झोन’चा आमदारांनाही झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 07:12 PM2018-10-01T19:12:16+5:302018-10-01T19:24:38+5:30

नारायणगाव येथील बसस्थानका समोरील मुख्य चौकात हॉटेल ऋषी समोर आमदार -विधानसभा सदस्य असा स्टिकर असलेली गाडी महामार्गावर नो पार्किंग झोनमध्ये रस्त्यावरच मध्यभागी उभी असल्याने पोलिसांनी त्याला जॅमर लावला़..पण...

no parking zone fine to MLA s at narayangaon | नारायणगावला ‘नो पार्किंग झोन’चा आमदारांनाही झटका

नारायणगावला ‘नो पार्किंग झोन’चा आमदारांनाही झटका

Next
ठळक मुद्देआमदार चाबुकस्वार यांची सुमारे १० मिनिट अरेरावी करीत पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत२०० रुपयांची दंडात्मक कारवाई

नारायणगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून नो - पार्किंग मध्ये वाहन लावणाऱ्या अनेक पुढाऱ्यांना नारायणगाव पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे़. नो पार्किंगमध्ये वाहन लावणारे आमदार गौतम चाबुकस्वार यांना देखील रविवारी याचा प्रत्यय आला. मात्र, आमदार चाबुकस्वार यांच्या वाहनाला जॅमर लावल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची त्यांनी हुज्जत घालून अरेरावी केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली़
नारायणगाव येथील बसस्थानका समोरील मुख्य चौकात हॉटेल ऋषी समोर पोलिसांनी नो पार्किंग झोन केला आहे़ त्याठिकाणी रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची कार उभी केली होती. या कारवर आमदार -विधानसभा सदस्य असा स्टिकर असलेली गाडी महामार्गावर नो पार्किंग झोनमध्ये रस्त्यावरच मध्यभागी उभी असल्याने पोलिसांनी त्याला जॅमर लावला़ कार चालक साडेचार वाजता गाडी जवळ आला. त्याने जामर पहिल्यावर पोलिसांची आमदारांची गाडी आहे म्हणत हुज्जत घातली. तसेच दमही दिला. पण पोलिसांनी आपली गाडी नो पार्किंग मध्ये उभी असल्याने वाहतूक नियमाचे उल्लंघन झाले आहे, तुम्हाला पावती फाडावीच लागेल असे सांगितले. यादरम्यान आमदार गौतम चाबुकस्वार कारच्या पुढील सीट वर येऊन बसले़. त्यांना चालकाने गाडीला पोलिसांनी जामर लावल्याचे सांगितले.  हे ऐकताच आमदार साहेबांचा राग अनावर झाला़. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल लोहार यांना ‘चल रे जॅमर काढ, नाहीतर तुझी वर्दी उतरवेल, मी आमदार आहे. तुझ्या एसपीला फोन लावू का, जॅमर काढ’ अशी अरेरावी करीत पोलीस कर्मचाऱ्याशी सुमारे १० मिनिट हुज्जत घातली. शेवटी वादविवाद चालू असताना स्थानिक पत्रकार तिथे आले व त्यांनी आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या सचिवांनीही पत्रकारांशी ही अरेरावी केली़. शेवटी उपस्थित पत्रकारांनी कायदा सर्वांना समान असून जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी, नारायणगावचे सरपंच आणि पंचायत समिती सभापती यांनीही कायद्याचा आदर करीत स्वत: २०० रुपयांची पावती फाडली आहे. आपणही लोकप्रतिनिधी आहात. आपण  कायद्याचा आदर करावा, असे सांगितल्यावर आमदार चाबुकस्वार यांचा राग शांत झाला. त्यांचे चालक पंकज सुरेश बोरकर , पुणे यांनी मोटर वाहन कलम ११९/१७७ नुसार २०० रुपये दंडाची पावती फाडली़ आणि आमदार पुण्याच्या दिशेने रवाना झाले.   

Web Title: no parking zone fine to MLA s at narayangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.