नाे मंदिर नाे वाेट्स ; शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर अज्ञातांची पाेस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 04:51 PM2018-11-06T16:51:26+5:302018-11-06T16:55:16+5:30
शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर अज्ञातांकडून पाेस्टर लावत राम मंदिराप्रकरणी थेट पंतप्रधान माेदींना लक्ष करण्यात अाले अाहे.
पुणे : राम मंदिराचा मुद्दा अाता थेट पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयापर्यंत येऊन पाेहचला अाहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर अज्ञातांकडून पाेस्टर लावत राम मंदिराप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र माेदींना लक्ष करण्यात अाले अाहे. हॅशटॅग नाे मंदिर नाे वाेट्स असे एका पाेस्टरवर लिहीत थेट पंतप्रधानांना अाव्हान करण्यात अाले अाहे.
राम मंदिराचा प्रश्न हा बाबरी मशिद पाडली तेव्हा पासून म्हणजेच 1992 पासून न्यायप्रविष्ट प्रश्न अाहे. निवडणुकींच्या ताेंडावर वेळाेवेळी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्यात येत अाहे. राम मंदिराच्या उभारणीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना अाग्रही असताना अाता अज्ञातांनी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर पाेस्टरबाजी करत थेट माेदींना अावाहन केले अाहे. राम मंदिर न बांधल्यास माेदींना मत देणार नाही, असा मजकूर या पाेस्टर वर छापण्यात अाला अाहे. तसेच 2019 च्या अाधी कायदा करुन राम मंदिर बांधण्याचे अावाहन यात करण्यात अाले अाहे. ही पाेस्टर इंग्रजी मध्ये असून अाज दिवसभर न्यायालयात ही पाेस्टर्स चर्चेचा विषय झाली अाहेत.
2019 च्या निवडणुका जवळ असल्याने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जात अाहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी जानेवारी २०१९ पर्यंत पुढे ढकलली आहे. अयोध्येत योगी आदित्यनाथ राम मंदिर किंवा रामाचा पुतळा याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा अाता पुण्यापर्यंत पाेहचल्याचे चित्र अाहे.