एल निनो आणि मॉन्सूनचा संबंध नाही :हवामान अभ्यासकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 09:25 PM2019-04-03T21:25:43+5:302019-04-03T21:28:44+5:30

१९५० ते २००० सालापर्यंत एकूण १३ वेळा एल निनो होता़ त्यात केवळ तीन वेळा एन निनो असताना देशात दुष्काळ पडला होता़. त्यामुळे मॉन्सून या प्रचंड मोठ्या असलेल्या सिस्टिमपुढे तुलनेने लहान एल निनो किंवा ला निनो  यांचा काही एक संबंध नसल्याचा दावा भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी केला आहे़

No relation between El Nino and Monsoon : The weather researchers claim | एल निनो आणि मॉन्सूनचा संबंध नाही :हवामान अभ्यासकांचा दावा

एल निनो आणि मॉन्सूनचा संबंध नाही :हवामान अभ्यासकांचा दावा

Next

पुणे : १९५० ते २००० सालापर्यंत एकूण १३ वेळा एल निनो होता़ त्यात केवळ तीन वेळा एन निनो असताना देशात दुष्काळ पडला होता़. त्यामुळे मॉन्सून या प्रचंड मोठ्या असलेल्या सिस्टिमपुढे तुलनेने लहान एल निनो किंवा ला निनो  यांचा काही एक संबंध नसल्याचा दावा भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी केला आहे़. अमेरिकन क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला असून त्यामुळे २०१९ मध्ये भारतात दुष्काळ आणू शकेल, असा अंदाज व्यक्त केला आहे़. यंदा देखील स्कायमेंटने मॉन्सून खराब होईल असा अंदाज एल निनोला गृहित धरुन व्यक्त केला आहे़. 

याबाबत किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार केला असता एल निनो किंवा ला निनो चा मॉन्सूनशी काही संबंध नाही़. एल निनोच्या भितीचा बागुलबुवा उभा केला गेला आहे़. एल निनोच्या सगळ्या वर्षात मात्र भारतावर दुष्काळ पडला नव्हता़. विशेष म्हणजे आतापर्यंत जितक्या वेळा एल निनो तयार झाला़. त्यातील निम्म्या वेळा त्याचा मॉन्सूनवर काडीचाही प्रभाव एल निनोने मॉन्सूनवर दाखविला नाही़. या उलट १९९७ मध्ये एल निनो सर्वात जास्त उष्ण होता आणि भारतात दुष्काळ पडणार अशी भाकिते हवामान विभागासह अनेक ठिकाणचे हवामान संशोधक करीत होते़. त्या वर्षी भारतात मॉन्सून भरभरुन झाला होता़ विषववृत्तीय भारतीय सागरातील आवर्तन निर्माण झाल्याने  सी सॉ परिणाम होऊन आवर्तनाच्या आणि भारताच्या देखील पश्चिमेकडील भागात पाऊस वाढतो़.  तर आर्वतनाच्या पूर्वला पाऊस कमी होते, ही स्थिती एल निनो असताना देखील १९९७ आणि २००६ या वर्षी भारतासाठी वरदान ठरली असे शास्त्रीय कारण एस गाडगीळ या भारतीय संशोधकाने करंट सायन्समध्ये दिली आहेत़ .

मॉन्सूनचा विचार करताना  दूरवरच्या या सागरी प्रवाहाचा विचार करणे म्हणजे बिरबल की खिचडी पकाना होय़. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी आॅफ कोलारॅडोतर्फे व्यक्त करण्यात आलेल्या मतानुसार मॉन्सूनवर एल निनो च्या पडणाºया प्रभावाचा अंदाज देणे ही अवघड गोष्ट आहे़. एल निनोचा बागलबुवा करत शेतकºयांनी उगीचच घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही, असे असे किरणकुमार जोहरे यांनी सांगितले़. 

  • १९५० ते २००० या सालापर्यंत एकूण तेरा वेळा एल निनो होता़ १९५१, १९६५, १९९६६, १९७२, १९७४, १९७९, १९८२, १९८३, १९८६, १९८७, १९९१, १९९२, १९९७ या वेळी एल निनो होता़ त्यात केवळ तीन वेळा म्हणजे १९५१, १९६५ आणि १९७२ मध्ये दुष्काळ पडला होता़ 

 

  • १८७१ ते २०१२ पर्यंतच्या कालावधीततील एल निनोची तीव्रता व मॉन्सूनचे बळ यांचा आलेख अभ्यासताना मॉन्सून आणि एल निनो यांचा काही संबंध आहे, याबद्दलच मुलभूत शंका निर्माण होते़ 

 

  • २०१५ साली प्रबळ एल निनो होता तर, २०१६ साली मात्र उष्ण वर्ष असून ला निना होता़ विशेष म्हणजे २०१८ मध्ये आॅगस्ट महिन्यानंतर मात्र मध्यम ला निना व नंतर २०१९ मध्ये पुन्हा एल निनो हा उष्ण सागरी प्रवाह निर्माण होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे़ अशा वेळी सागरी प्रवाहांची निर्मिती आणि त्यांचे आर्वतन या बाबत विश्लेषण अधिकाधिक जटील होत जाते़ त्यामुळे मॉन्सून आणि एल निनो किंवा ला निनो यांचा काही एक संबंध नाही़ :किरणकुमार जोहरे

Web Title: No relation between El Nino and Monsoon : The weather researchers claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.