ग्रामीण भागातील लग्नात ‘नियमांचाच वाजतोय बँन्ड’, एका-एका लग्नात २५० -३०० लोकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 04:00 PM2020-07-02T16:00:15+5:302020-07-02T16:06:13+5:30

लग्नांमुळे कोरोना विषाणूच्या सामुहिक संसर्गाचा धोका

' No Rules are following in weddings at rural areas; 250-300 people present in marriage | ग्रामीण भागातील लग्नात ‘नियमांचाच वाजतोय बँन्ड’, एका-एका लग्नात २५० -३०० लोकांची उपस्थिती

ग्रामीण भागातील लग्नात ‘नियमांचाच वाजतोय बँन्ड’, एका-एका लग्नात २५० -३०० लोकांची उपस्थिती

Next
ठळक मुद्देनेते, पुढाऱ्यांची उपस्थिती ठरतेय अधिक धोकादायक 

पुणे : गेल्या एक महिन्यांपासून जिल्ह्यात सर्वत्र दररोज लग्नाचे बँन्ड वाजू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्यास परवानगी दिली असताना सध्या ग्रामीण भागात सर्व नियम धाब्यावर बसवत लग्नांचा बार उठवला जात आहे. अनेक तालुक्यात एका-एका लग्नात 250-300 लोक उपस्थितीत लावत आहेत. यामुळे ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. हे प्रकार सुरुच राहिल्यास सामुहिक संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यातच लग्न समारंभावर बंदी घालण्यात आली. यामुळे यंदाचा लग्नांचा संपूर्ण हंगाम वाया गेला. परंतु 'बिगींन आगेन' मध्ये शासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी दिली आहे. परंतु शासनाने दिलेल्या परवानगीचा आता नागरीक गैरफायदा घेत असून, अत्यंत धूमधडाक्यात लग्न समारंभ सुरू झाले आहेत. सध्या बहुतेक सर्व तालुक्यात लग्नांचे बार वाजू लागले आहेत. एका लग्नात 250-300 लोकांची उपस्थिती ग्रामीण भागात कोरोनाच्या सामुहिक संसगार्चा धोका वाढू शकतो. 
ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांत अचानक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. यामध्ये अनेक जणांची लग्न समारंभातील उपस्थितीत व त्यामुळे झालेली कोरोनाची लागण हे देखील एक कारण आहे. कारण अनेक लग्नांमध्ये पुणे, मुंबई या रेड झोन मधील नागरिकांची उपस्थिती ही अत्यंत गंभीर बाब आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे .
-------
नेते, पुढाऱ्यांची उपस्थिती ठरतेय अधिक धोकादायक
सध्या ग्रामीण भागात लग्नांचा बार जोरात सुरू आहे. कोरोनाच्या संकटामध्ये लग्नातील उपस्थितीला मयार्दा घालण्यात आली आहे. असे असताना अनेक लग्नांमध्ये नेते, पुढारी उपस्थित लावत आहेत. लग्नाला पुढारी, नेते आल्यानंतर गर्दी मध्ये आणखी वाढ होत आहे. यामुळे देखील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Web Title: ' No Rules are following in weddings at rural areas; 250-300 people present in marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.