भोर तालुक्यातील निर्भया पथकाला अपुऱ्या मनुष्यबळाचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 02:35 PM2019-12-11T14:35:26+5:302019-12-11T14:46:17+5:30

एकाच महिला पोलिसांवर टवाळखोरांना रोखण्याचा भार

No sufficient Manpower to Nirbhaya squad in bhor taluka | भोर तालुक्यातील निर्भया पथकाला अपुऱ्या मनुष्यबळाचे ग्रहण

भोर तालुक्यातील निर्भया पथकाला अपुऱ्या मनुष्यबळाचे ग्रहण

googlenewsNext
ठळक मुद्देभोर तालुक्यातील स्थिती ; सहा महिन्यांत केवळ ९१ कारवायातालुक्यात छेडछाड, टवाळखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस आहे वाढत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांअभावी एकही कारवाई झालेली नाही

भोर : महिला पोलीस कर्मचारी कमी असल्याने भोर उपविभागीय पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या चार पोलीस ठाण्यांत नेमलेल्या निर्भया पथकात एकच महिला पोलीस कर्मचारी काम करत आहे. यामुळे चार पोलीस ठाण्यातील केवळ एका महिला कर्मचारीला शहरात जाऊन छेडछाड टवाळखोरी रोखण्याच्या घटना अवघड होत आहे. यामुळे तालुक्यात छेडछाड, टवाळखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा त्रास मात्र सर्वसामान्य महिला आणि मुलींना सहन करावा लागत आहे. 
 भोर तालुका दुर्गम डोंगरी असून शाळा-कॉलेजला ग्रामीण भागातून अनेक मुली शिक्षणासाठी एसटीने प्रवास करुन येतात. या  मुलींची छेडछाड, टवाळखोरी होऊ नये, यासाठी भोर उपविभागीय पोलीस कार्यालयाकडून जेजुरी, सासवड, भोर आणि नसरापूर येथील पोलीस ठाणे मिळून निर्भया पथक स्थापन करण्यात आले.  प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजाराच्या दिवशी जाऊन टावळखोर, छोडछाड करणाºयांवर या पथकाद्वारे कारवाई केली जाते. 
मागील वर्षी या पथकात तीन महिला पोलीस काम करीत होत्या. मात्र, भोरला महिला पोलीस कमी असल्याने मागील सहा महिन्यांपासून नसरापूर पोलीस ठाण्यातील केवळ एका महिला पोलिसांची चार पोलीस ठाण्यांसाठी नेमणूक करण्यात आली आहे.  चारही पोलीस ठाण्यांचे अंतर आणि निर्भया पथकात एकच महिला पोलिसांची नेमणूक करण्यात असल्याने निर्भया पथकाचे काम कसे चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या परिसरासाठी केवळ एक महिला पोलीस असल्याने दिवसेंदिवस टवाळखोरी आणि छेडछाड करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्यावर अंकुश आणण्यासाठी निर्भया पथकात महिला पोलीस वाढवण्याची  गरज आहे. तरच कारवाई शक्य होणार आहे. अन्यथा हे पथक नावालाच राहणार आहे.
...
सहा महिन्यांत केवळ ९१ कारवाया
विटभट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांची मुले शाळेत जात नाहीत. या विटभट्ट्यांना भेटी देऊन त्यांची माहिती घेण्याचे काम निर्भया पथकालाच करायचे आहे. मात्र, पथकात महिला पोलीस कमी असल्याने हे काम करणे शक्य होत नाही. निर्भया पथकाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात २३, फेब्रुवारी महिन्यात ३०, मार्च महिन्यात ११, एप्रिल महिन्यात १०, मे महिन्यात शून्य, जून महिन्यात  ६, जुलै महिन्यात ११, तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांअभावी एकही कारवाई झालेली नाही. जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत केवळ ९१  कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
.......
निर्भया प्रथकाच्या माध्यमातून भोर, नसरापूर, सासवड, जेजुरी या पोलीस ठाण्यांर्तगत असलेल्या शाळा-कॉलेजात जाऊन मुलींना समुपदेशन करणे, छेडछाड होऊ नये म्हणून मार्गदर्शन करणे  या शिवाय  बसस्थानकावर, शाळा- कॉलेजच्या प्रवेशद्वारावर टवाळक्या करणारे, छेडछाड करणाºया मुलांवर त्वरित कारवाई करत असल्याचे निर्भया पथकाच्या प्रमुख स्वाती कुतवळ यांनी सांगितले.   

Web Title: No sufficient Manpower to Nirbhaya squad in bhor taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.