पुरंदरच्या जिरायती पट्ट्यातील ऊस शिल्लक राहणार नाही : जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:48+5:302021-03-20T04:10:48+5:30
पुरंदर तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील उसाची तोड लवकरात लवकर करावी, अशी मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व ऊस उत्पादक ...
पुरंदर तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील उसाची तोड लवकरात लवकर करावी, अशी मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व ऊस उत्पादक संदीप चिकणे यांनी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तालुक्यातील राजुरी, रिसे, पिसे, पिंपरी, मावडी सुपे, माळशिरस, टेकवडी, नायगाव, आंबळे, वाघापूर, भोसलेवाडी, बेलसर, खळद, तक्रारवाडी, शिवरी, साकुर्डे, कुंभारवळन, एखतपूर पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यातील ऊस उन्हाळ्यामुळे तसेच पाण्याची कमतरतेमुळे जळून जाऊ लागला आहे.
जिरायती पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून सोसायटी भरण्यासाठी आर्थिक तरतूद ही नाही. यासाठी आपल्या अधिकारात या परिसरातील ऊस तोडणीस प्राधान्य देऊन ऊस उत्पादकांना सहकार्य करावे असे पत्र चिकणे यांनी दिले आहे.
सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष जगताप यांनी ही याबाबत तातडीने दखल घेऊन तशा सूचना ही संबंधितांना दिल्याचे संदीप चिकणे यांनी सांगितले.
१९जेजुरी
सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना पत्र देताना संदीप चिकणे.