ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा लागेना थांगपत्ता : शोधासाठी पालिकेची पोलिसांकडे धाव- प्रशासन, नागरिकांसाठी हे प्रवासी डोकेदुखीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:10+5:302020-12-30T04:14:10+5:30

पुणे : इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने, पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे़ ...

No trace of passengers from UK: Municipal Corporation rushes to police for search - Administration | ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा लागेना थांगपत्ता : शोधासाठी पालिकेची पोलिसांकडे धाव- प्रशासन, नागरिकांसाठी हे प्रवासी डोकेदुखीच

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा लागेना थांगपत्ता : शोधासाठी पालिकेची पोलिसांकडे धाव- प्रशासन, नागरिकांसाठी हे प्रवासी डोकेदुखीच

Next

पुणे : इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने, पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे़ पुण्यात आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचे पत्ते व संपर्क क्रमांकाप्रमाणे शोध लागत नसल्याचे यात सांगण्यात आले आहे़ त्यामुळे ही चिंतेची बाब असून, प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखीच ठरणार आहे.

पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़ आशिष भारती यांनी याबाबत पोलिसांना पत्र दिले आहे़ कोरोना नवीन विषाणू आढळून आल्याने राज्य शासनाने परदेशातून विशेषत: इंग्लंडहून १ डिसेंबरपासून आलेल्या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करावी व त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली, तर त्यांना इतरांपासून विलग करून लागलीच रूग्णालयात दाखल करण्याबाबतचे आदेश दिले आहेत़

पुणे शहरात इंग्लंडहून थेट विमानसेवा नाही़ परंतु, मुंबईहून पुण्यात इंग्लंडहून आलेले ५४२ प्रवासी आहेत़ त्यांचे संपर्क क्रमांक व पत्ते महापालिकेकडे संबंधित यंत्रणेने दिले होते़ मात्र महापालिकेच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टिमला यातील १०९ जणांचे पत्ते आढळून आलेले नाहीत़ यामध्ये काहींचे चुकीचे पत्ते असून, अनेकांचे संपर्क क्रमांकच नॉटरिचेबल लागत आहेत़ यामुळे अखेर महापालिकेने अशा १०९ जणांची यादी पुणे पोलिसांकडे दिली असून त्यांचा शोध करावा अशी विनंती केली आहे़

------------------------

प्रवासी थेट आलेच कसे ?

कोरोना विषाणूची लागण झाली, तेव्हा देखील देशात दुसऱ्या मार्गाने अनेक प्रवासी आले होते. त्यांनी आपली ओळख लपवल्याने संपूर्ण देशभरात ही लागण पसरली. त्यामुळे आता परदेशातील विमान सेवा बंद करणे आवश्यक होते. किंवा किमान बाहेरून येणाऱ्यांना प्रवाशांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइन करायला हवे होते. परंतु, नवीन विषाणू आल्यानंतर अनेक प्रवासी थेट परदेशातून मुंबईला आणि तेथून पुण्यात आले आहेत, त्यांना तपासणी न करता सोडले कसे ? त्यांना मुंबईतच रोखले का नाही ? असे सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहेत. ते जर नवीन विषाणूने बाधित असतील, तर मात्र त्यांच्यापासून अनेकांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रसार अधिक होऊ शकतो. याबाबबत आता पोलीस संबंधित प्रवाशांचा तपास करणार आहेत.

Web Title: No trace of passengers from UK: Municipal Corporation rushes to police for search - Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.