ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागेना; शोधासाठी पालिकेची पोलिसांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 09:01 PM2020-12-28T21:01:17+5:302020-12-28T21:01:52+5:30

पुण्यात आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचे पत्ते व संपर्क क्रमांकाप्रमाणे शोध लागत नसल्याची धक्कादायक माहिती समोर..

No trace of passengers who came from Britain; The municipality rushed to the police for search | ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागेना; शोधासाठी पालिकेची पोलिसांकडे धाव

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागेना; शोधासाठी पालिकेची पोलिसांकडे धाव

googlenewsNext

पुणे : इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने, पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. पुण्यात आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचे पत्ते व संपर्क क्रमांकाप्रमाणे शोध लागत नसल्याचे यात सांगण्यात आले आहे. 

पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़आशिष भारती यांनी याबाबत पोलिसांना पत्र दिले आहे. कोरोना नवीन विषाणू आढळून आल्याने राज्य शासनाने परदेशातून विशेषत: इंग्लंडहून १ डिसेंबरपासून आलेल्या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करावी व त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली तर त्यांना इतरांपासून विलग करून लागलीच रूग्णालयात दाखल करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

पुणे शहरात इंग्लंडहून थेट विमानसेवा नाही. परंतु, मुंबईहून पुण्यात इंग्लंडहून आलेले ५४२ प्रवासी आले आहेत.त्यांचे संपर्क क्रमांक व पत्ते महापालिकेकडे संबंधित यंत्रणेने दिले होते. मात्र महापालिकेच्या कॉनटॅक्ट ट्रेसिंग टिमला यातील १०९ जणांचे पत्ते आढळून आलेले नाहीत. यामध्ये काहींचे चुकीचे पत्ते असून, तन अनेकांचे संपर्क क्रमांकच नॉटरिचेबल लागत आहेत.यामुळे अखेर महापालिकेने अशा १०९ जणांची यादी पुणे पोलिसांकडे दिली असून त्यांचा शोध करावा अशी विनंती केली आहे. 

--------------------------

Read in English

Web Title: No trace of passengers who came from Britain; The municipality rushed to the police for search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.