शहरातील २८ रस्त्यांवर नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 06:54 AM2017-12-07T06:54:20+5:302017-12-07T06:54:23+5:30

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी व वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेने शहरातील २८ रस्त्यांवर नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन जाहीर करण्यात आला आहे़

No traffic violet zone on 28 roads in the city | शहरातील २८ रस्त्यांवर नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन

शहरातील २८ रस्त्यांवर नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन

Next

पुणे : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी व वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेने शहरातील २८ रस्त्यांवर नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन जाहीर करण्यात आला आहे़ या रस्त्यावर नो पार्किंग, सिग्नल तोडणे, उलट्या दिशेने वाहन चालविणे, हेल्मेट परिधान न करणे असे विविध वाहतुकीचे नियम तोडणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे़ या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या मोहिमेची सुरुवात ७ डिसेंबरपासून संपूर्ण पुणे शहर व पिंपरी- चिंचवडमध्ये करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले़
वाहतूक शाखेच्या प्रत्येक विभागातील एक भाग निवडून त्या रस्त्यावर जास्तीतजास्त अधिकारी व कर्मचारी नेमून नियमभंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे़ ज्यायोगे हा संपूर्ण भाग पूर्णपणे वाहतूक नियम भंगविरहित करण्याचा प्रायोगिक तत्त्वावर प्रयत्न केला जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी कळविले आहे़ यामध्ये जेधे चौक ते एस पी़ कॉलेज चौक, गाडीतळ पुतळा चौक ते बुधवार चौक, सेवासदन चोक ते टिळक चौक, नळस्टॉप चौक ते करिष्मा चौक, नवले पुल चौक ते वडगाव पुल चौक, तुकाराम पादुका चौक ते गुडलक चौक, सिमला आॅफिस चौक ते गाडगीळ पुतळा चौक, व्होल्गा चौक ते मार्केटयार्ड चौक, पुष्पमंगल चौक ते चंद्रलोक चौक, सावरकर पुतळा चौक ते दांडेकर पूल चौक, भारती विद्यापीठ मागील गेट ते त्रिमूर्ती चौक, पॉवर हाऊस चौक ते रामोशी गेट चौक, ट्रायलक हॉटेल ते आंबेडकर पुतळा, आय बी चौक ते ब्ल्यु नाईल चौक, कोरेगाव पार्क चौक ते ए बी सी फार्म चौक, बाणेर फाटा चौक ते विद्यापीठ चौक, फातिमानगर -इनामदार हॉस्पिटल चौक ते जगताप चौक, बोपोडी चौक ते खडकी बाजार चौक, चंद्रमा चौक ते विश्रांतवाडी चौक, खडी मशीन चौक ते शत्रुंजय मंदिर चौक़
पिंपरी परिसरातील जगताप चौक ते कोकणे चौक, पिंपरी चौक ते शगुन चौक, हॅरीस पुल चौक ते फुगेवाडी चौक, बिजलीनगर चौक ते वाल्हेकरवाडी टी जंक्शन, संभाजी चौक ते काचघर चौक, टी जंक्शन चौक ते शिवाजी चौक, सीसीडी चौक ते श्रीकृष्ण हॉटेल चौक, नोबल हॉस्पिटल चौक ते मारुती सुझुकी शोरुम चौक, या रस्त्यांवर हा नो ट्रॉफिक व्हायोलेशन झोन राबविण्यात येणार आहे़

Web Title: No traffic violet zone on 28 roads in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.