पवना भरूनही उपयोग शून्य; दररोज पाणी मिळणार केव्हा? प्रशासकराजचा नागरिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 01:58 PM2023-08-24T13:58:52+5:302023-08-24T13:59:25+5:30

यंत्रणा नसल्याची कबुली...

No use even when filled with wind; When will you get water every day? Administrator Raj hit the citizens | पवना भरूनही उपयोग शून्य; दररोज पाणी मिळणार केव्हा? प्रशासकराजचा नागरिकांना फटका

पवना भरूनही उपयोग शून्य; दररोज पाणी मिळणार केव्हा? प्रशासकराजचा नागरिकांना फटका

googlenewsNext

- ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : पिंपरी - चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाल्यानंतर आता दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे. मात्र, शहराला दरदिवशी पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणाच नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

शहरात चारही बाजूने टोलेजंग इमारती उभ्या राहत असल्याने पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, शहराच्या टोकाच्या भागांतील म्हणजे दापोडी, फुगेवाडी, सांगवी, पिंपळे निलख, दिघी, भोसरी, चिखली, मोशी येथे सातत्याने पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. शटडाऊन, बिघाड, दुरुस्तीकाम तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सुरळीत पाणीपुरवठा न झाल्याने सलग दोन - तीन दिवस अनेक भागांत तक्रारी वाढतात. जनसंवाद सभेत पाण्याबाबतच्या तक्रारी अधिक येतात. महापालिकेकडे पाणीपुरवठ्याबाबत नियोजनच नाही. त्यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

गळती रोखण्याकडे दुर्लक्ष

सध्या पवना नदीतून उचलून शहराला ४८० ते ४९० एमएलडी पाणी पुरविले जात आहे. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी येते. एमआयडीसीचेही पाणी काही भागांना दिले जात आहे. या एकूण ५३४ एमएलडी पाण्यापैकी ३० ते ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे. चोरी, अनधिकृत नळजोडणी, गळती आदींमुळे पाणी वाया जात आहे. गळती रोखण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

दिवसाआड पुरवठ्यावर प्रशासन ठाम

धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने शहरवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा होईल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, दररोज पाणीपुरवठा केल्यास चढावरील भागात पाणी जात नाही. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे सर्वांना समान पाणी मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी पुरवठ्यावर प्रशासन ठाम आहे. दररोज पाणीपुरवठ्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत धरण १०० टक्के राहिल्यानंतर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाणी पुरेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.

Web Title: No use even when filled with wind; When will you get water every day? Administrator Raj hit the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.