पाणीकपात नाही!
By admin | Published: January 30, 2016 04:10 AM2016-01-30T04:10:30+5:302016-01-30T04:10:30+5:30
पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यात कपात करणार असल्याच्या चर्चेस पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी पूर्णविराम दिला. धरणात पुरेसे पाणी असून त्याच्या वितरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
पुणे : पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यात कपात करणार असल्याच्या चर्चेस पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी पूर्णविराम दिला. धरणात पुरेसे पाणी असून त्याच्या वितरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, शेतीसाठी पाणी देण्यात येणार नसून यासंदर्भात लवकरच बैठक होईल, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पुण्याच्या पिण्याच्या पाण्यात कपात करणार असल्याचे संकेत दिले होते. बापट यांनी याबाबत विचारले असता त्यांनी त्याला नकार दिला. धरणात पुरेसे पाणी असून त्याचे योग्य नियोजन केलेले आहे. पुणे शहराजवळच्या दौंड, शिरूर, इंदापूर तालुक्यांना पाझर तलाव भरण्यासाठी धरणांमधून दरवर्षी पाणी दिले जाते. त्यांच्यासाठी धरणात राखीव साठा असतो. त्यातून त्यांना पाणी देण्यात येईल; मात्र याबाबत बैठक घेऊनच निर्णय होईल, असे बापट म्हणाले. (प्रतिनिधी)