Railway: आरक्षणाची चिंता नाही! प्रवाशांनो दिवाळीत २८ विशेष रेल्वे धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:12 AM2023-10-14T11:12:36+5:302023-10-14T11:13:15+5:30
या सणासाठी ७४ विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात असून २८ फेऱ्या पुण्यातून होणार असून, उर्वरित मुंबईवरून होतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले....
पुणे : दसरा, दिवाळी, छटपूजा या सणांमुळे प्रवाशांची गर्दी होत असल्याने पुणेरेल्वे विभागातून पुणे मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या सणासाठी ७४ विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात असून २८ फेऱ्या पुण्यातून होणार असून, उर्वरित मुंबईवरून होतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
पुणे-अजनी व पुणे-गोरखपूर या सुपर फास्ट विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यामध्ये पुणे - अजनी गाडी क्र. ०२१४१ दि. १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी दुपारी ०३:१५ वाजता पुणे येथून सुटणार ते दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:५० वाजता अजनीला पोहचेल. त्याचबरोबर गाडी क्र. ०२१४२ अजनी ते पुणे ही दि. १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दर बुधवारी अजनी येथून सायं ०७:५० वाजता सुटेल ते दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३५ वाजता पुणे येथे पोहोचेल. या दौंड दोरमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धापर्यंत थांबा घेईल. या गाडीमध्ये एकूण २० कोच असून ३ एसी २ टियर, १५ एसी-३ टियर आणि दोन जनरेटर कोच .
तसेच, पुणे-गोरखपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष रेल्वेच्या १४ फेऱ्या होणार असून, या गाडीला २२ आयसीएफ कोच असतील. ही विशेष गाडी दि. २० ऑक्टो. ते ०१ डिसेंबर २०२३ दरम्यान (७ फेऱ्या) दर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०९ वाजता गोरखपूरला पोहोचेल. तर गोरखपूर येथून दि. २१ ऑक्टोंबर ते २ डिसेंबर २०२३ दरम्यान (७ फेऱ्या) दर शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि तिसर्या दिवशी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. दरम्यान ही गाडी दौंडमार्गे लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद येथे थांबा घेईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.