म्युकरमायकोसिससंदर्भात नोडल अधिकारी नियुक्त करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:19+5:302021-05-25T04:12:19+5:30

पुणे : ‘म्युकरमायकोसिस’बाबतची माहिती नागरिकांना व्हावी व या आजाराविषयी अधिक स्पष्टता यावी़, याकरिता एका स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात ...

A nodal officer should be appointed for mucorrhoea | म्युकरमायकोसिससंदर्भात नोडल अधिकारी नियुक्त करावा

म्युकरमायकोसिससंदर्भात नोडल अधिकारी नियुक्त करावा

Next

पुणे : ‘म्युकरमायकोसिस’बाबतची माहिती नागरिकांना व्हावी व या आजाराविषयी अधिक स्पष्टता यावी़, याकरिता एका स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्राद्वारे केली आहे़

पुणे शहरात गेल्या काही दिवसांत म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांची वाढ होत आहे़ मात्र याबाबत नेमकी रुग्णसंख्या किती आहे, यातील उपचार किती रुग्ण घेत आहेत, किती रुग्ण बरे झाले? याबाबतची माहिती नागरिकांना कळत नाही़ त्यामुळे आगामी काळात नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ शकते. याकरिता याबाबतची माहिती देण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याने याबाबत अधिक स्पष्टता येऊ शकेल, असे मुळीक यांनी पत्रात नमूद केले आहे़

------------------------

Web Title: A nodal officer should be appointed for mucorrhoea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.