पुण्यात उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा शिथिल, गणेशोत्सवासाठी ६ दिवस, नवरात्रात मिळणार २ दिवस

By नितीन चौधरी | Updated: February 12, 2025 19:58 IST2025-02-12T19:58:12+5:302025-02-12T19:58:52+5:30

पुण्यात वर्षभरातील उत्सवांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी जिल्हा प्रशासनाकडून १५ दिवस निश्चित

Noise limit relaxed during festivals in Pune 6 days for Ganeshotsav 2 days during Navratri | पुण्यात उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा शिथिल, गणेशोत्सवासाठी ६ दिवस, नवरात्रात मिळणार २ दिवस

पुण्यात उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा शिथिल, गणेशोत्सवासाठी ६ दिवस, नवरात्रात मिळणार २ दिवस

पुणे: जिल्ह्यासाठी वर्षभरातील उत्सवांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी जिल्हा प्रशासनाने १५ दिवस निश्चित केले आहेत. त्यात गणेशोत्सवासाठी ६ दिवस तर नवरात्रासाठी २ दिवस ध्वनीमर्यादा सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियमानुसार जिल्ह्यात १५ दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यात शिवजयंती बुधवार१९फेब्रुवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोमवार १४ एप्रिल, महाराष्ट्र दिन गुरवार १ मे, गणपती उत्सव, ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशीपर्यंत सोमवार १ ते शनिवार ६ सप्टेंबरपर्यंत ६ दिवस, नवरात्री उत्सव १ व २ऑॅक्टोबरपर्यंत २ दिवस, नाताळ गुरुवार २५ डिसेंबर व वर्षाअखेर बुधवार ३१ डिसेंबर असे १३ दिवस असतील. तसेच महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार २ दिवस परवानगी दिली जाईल असेही डूडी यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

उत्सवाच्या दिवशी या वेळेत ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. झोनींग प्रमाणे ठरलेल्या मयादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागु नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित सर्व यंत्रणांची राहील असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Web Title: Noise limit relaxed during festivals in Pune 6 days for Ganeshotsav 2 days during Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.