निनादले बँडचे सूर...

By admin | Published: March 21, 2017 05:30 AM2017-03-21T05:30:42+5:302017-03-21T05:30:42+5:30

विविध दिव्यांच्या रोषणाईने सजलेला परिसर... एनडीएच्या बँड पथकाचे मधुर स्वर... माजी विद्यार्थ्यांच्या लघुपटांचा आस्वाद घेण्याची संधी

The noise of the ninadale band ... | निनादले बँडचे सूर...

निनादले बँडचे सूर...

Next

पुणे : विविध दिव्यांच्या रोषणाईने सजलेला परिसर... एनडीएच्या बँड पथकाचे मधुर स्वर... माजी विद्यार्थ्यांच्या लघुपटांचा आस्वाद घेण्याची संधी आणि कलात्मकतेचा देदीप्यमान इतिहास उलगडणारे ‘डाऊन मेमरी लेन’ प्रदर्शन... अशा चैतन्यदायी वातावरणात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाची (एफटीआयआय) वास्तू उजळून निघाली. निमित्त होते, संस्थेच्या ५७व्या स्थापनादिनाचे.
संस्थेचे आवार व प्रसिद्ध ‘विज्डम ट्री’चा परिसर रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने नटला होता. संस्थेचा इतिहास उलगडणाऱ्या छायाचित्रांचे ‘डाऊन मेमरी लेन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वाळूचा वापर करून कला साकारणारे सुदर्शन पटनाईक यांच्या हस्ते झाले.
माजी विद्यार्थ्यांचे लघुपटदेखील या वेळी दाखविण्यात आले. क्रांती कानडे यांनी बनवलेला ‘चैत्र’, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘गिरणी’, अरुण सुकुमार यांचा ‘व्हेन धिस मॅन डाइज’, कौशल ओझा यांचा ‘आफ्टरगो’, आंद्रे्रे लॅनेटा यांचा ‘अल्ला इज ग्रेट’ आणि तुषार मोरे दिग्दर्शित ‘सदाबहार ब्रास बँड’ या लघुचित्रपटांचा रसिकांनी आस्वाद घेतला.
ज्येष्ठ कलावंत व माजी विद्यार्थी अरविंद सायगावकर, सुदर्शन पटनाईक, संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला, कुलसचिव वरुण भारद्वाज, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता अमित त्यागी व दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता राजेंद्र पाठक या वेळी उपस्थित होते. ‘‘एफटीआयआयची वास्तू मला शांतीनिकेतनसारखी भासते.
ही संस्था म्हणजे चित्रपटांचे गुरूकुल आहे,’’ अशी भावना सुदर्शन पटनाईक यांनी व्यक्त केली.

Web Title: The noise of the ninadale band ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.