Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 12:38 PM2022-02-20T12:38:19+5:302022-02-20T12:47:26+5:30

झेंडा हातामध्ये फडकवित असताना या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

noman attar boy dance in Shiv Jayanti utsav in daund | Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका

Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका

googlenewsNext

केडगाव : केडगाव तालुका दौंड येथील चिमुकला मुस्लिम शिवभक्त नोमान जावेद आत्तार या चिमुकल्याने शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये  शिवचरित्रावरील आरतीवर धरलेल्या ठेक्यामुळे चिमुकल्‍याचे सगळीकडे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे नोमानने हातामध्ये भगवा झेंडा घेतला आहे. झेंडा हातामध्ये फडकवित असताना या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

राजा तू राजा सामर्थ्यवंत! जाणता राजा तू योगी श्रीमंत!! या आरतीवरती ठेका धरल्यामुळे युवकांनी अक्षरशः चिमुकल्याला खांद्यावरती घेतले आहे. नोमानने उस्फूर्तपणे गाण्यास प्रतिसाद दिला आहे.नोमान हा जवाहरलाल विद्यालयांमध्ये पाचव्या इयत्तेत शिकत असून शाळेमध्ये अत्यंत हुशार असल्याची माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली. शाळेमध्ये वक्तृत्व, निबंध स्पर्धेमध्ये नोमानचा उस्फुर्त सहभाग असतो. आज दिवसभर सोशल मीडियावरती नोमानची चर्चा होती. नोमानचे वडील जावेद आतार यांचा बांगडी व्यवसाय असून आई घरकाम करते. मुलाने केलेल्या  त्यांना अभिमान वाटतो. दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी ओमानचे कौतुक केले आहे.

यासंदर्भात चिमुकला नोमान आत्तार म्हणाला की, लहानपणापासून मला महाराजांबद्दल आदर आहे. या जयंतीमध्ये मी सहभागी झालो. सर्वांनी माझे कौतुक केले आहे.

Web Title: noman attar boy dance in Shiv Jayanti utsav in daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.