उमेदवारीत अल्पशिक्षित आघाडीवर
By admin | Published: February 18, 2017 03:21 AM2017-02-18T03:21:13+5:302017-02-18T03:21:13+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. यामध्ये दहा निरिक्षर उमेदवारांंनी अर्ज दाखल केले आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. यामध्ये दहा निरिक्षर उमेदवारांंनी अर्ज दाखल केले आहेत. तर दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या २६० आहे. दहावी आणि बारावी पर्यत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या २८५, उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या २१८ आहे, तर निरक्षर मतदारांची संख्या १० आहे.
पालिकेतील ३२ प्रभागांसाठी १२८ जागांसाठी ७७३ उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहेत.एकूण उमेदवारांमध्ये पुरुष ४१३ आहेत, तर महिला ३०७ महिला उमेदवार आहेत. मंगळवारी (दि.२१) होणाऱ्या मतदानासाठी मतदारांची संख्या ११ लाख ९२हजार ८९ असून , पुरुष मतदार ६ लाख चाळीस हजार ६९६ तर यांची महिला मतदार ५ लाख ५१ हजार ३६२ आणि इतर मतदार ३१ आहेत. मतमोजणी गुरुवारी (दि.२३) ११ निवडणूक मतमोजणी कार्यालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे महिलांना उमेदवारी देण्याचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. (प्रतिनिधी)