आघाडी सरकारकडून असहकार्याचा फटका

By admin | Published: October 20, 2014 12:18 AM2014-10-20T00:18:45+5:302014-10-20T00:18:45+5:30

मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये सरळ लढत झाली.

Non-Cooperation Movement by the Alliance Government | आघाडी सरकारकडून असहकार्याचा फटका

आघाडी सरकारकडून असहकार्याचा फटका

Next

पिंपरी : मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये सरळ लढत झाली. पवना गोळीबार व आघाडी सरकारशी निगडीत असलेल्या प्रलंबित प्रश्नांमुळे राष्ट्रवादी काँगे्रसवर असलेला रोष आणि मतदारसंघातील भाजपचे वर्चस्व ही राष्ट्रवादीच्या पराभवाची कारणे ठरली.
मावळच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपच्या आमदाराला आघाडी सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये होती.
आघाडीचे सरकार असतानाही प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पवना गोळीबार प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँगे्रसबाबत मावळातील नागरिकांमध्ये रोष आहे.
आघाडीच्या जागावाटपात मावळची जागा राष्ट्रवादीच्याच वाट्याला येत होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत दाभाडे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे काम न केल्याचे बोलले जात होते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. तरुणवर्गाशी असलेला कमी संपर्क यामुळेही दाभाडे यांचे नुकसान झाले. आघाडी असताना निवडणुकीस सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादीला भाजप सरस ठरायची.
या निवडणुकीत तर राट्रवादी स्वतंत्र लढली. आघाडी तुटल्याचा राष्ट्रवादीला फटका बसला. पराभवासाठी अंतर्गत गटबाजी हे एक कारण ठरले.
बाळा भेगडे यांचा तरुण वर्गात चांगला संपर्क आहे. भाजपचा प्रभाव तर आहेच. युती तुटूनही मोदी लाट असल्याने भेगडे यांचा विजय सोपा झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Non-Cooperation Movement by the Alliance Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.