साहित्यबाह्य घटकांनी संमेलनामध्ये वृथा लुडबूड करू नये : प्रेमानंद गज्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 07:46 PM2019-09-25T19:46:51+5:302019-09-25T19:47:32+5:30
मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदं आजवर कोणत्या धर्माच्या लोकांनी सर्वाधिक भूषवली?..
पुणे : हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध,जैन धर्मियांबरोबरच आदिवासी,भटकेही मराठी भाषेत लेखन करतात. या सर्वांचा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर सारखाच अधिकार आहे. हा अधिकार प्राप्त होत असतांना लेखकाचं वाडमयीन कर्तृत्व जोखलं जातंच आणि तरीही कुणी धर्म वेगळा म्हणून साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नाकारत असेल तर हे मराठी भाषेला भूषणावह नाही, अशा शब्दांत नाट्य संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी विरोधकांना सुनावले आहे.
मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदं आजवर कोणत्या धर्माच्या लोकांनी सर्वाधिक भूषवली? तेव्हा कुणी आकांत केला नाही असा सवाल उपस्थित करीत एक फादर अध्यक्ष निवडला जाताच हिंदू मानसिकता विरोधात उभी राहिली याविषयी खेद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरील प्रेमानंद गज्वी यांची ही पोस्ट साहित्यवातुर्ळात चचेर्चा विषय ठरली आहे.
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड केल्याबददल हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधाचा सूर आळविला आहे. हे साहित्य संमेलन होऊ देणार नाही अशी भाषा केली जात आहे. त्यावर भाष्य करताना मराठी साहित्य संमेलन वाङमयकार दिब्रिटो यांच्या अध्यक्ष निवडीने संकटात सापडणार असं दिसू लागलंय. काही हिंदुत्ववादी विरोध करताना दिसत आहेत असे नमूद करून गज्वी यांनी नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची पाठराखण केली आहे.
...............
' लोकमत' शी बोलताना प्रेमानंद गज्वी म्हणाले, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाला विरोध करणारे साहित्यबाहय घटक ज्यांचा वाचक म्हणून संबंध असणे वेगळे, पण स्वत: लेखक किंवा साहित्यनिर्मितीशी नसेल तर अशा लोकांनी आम्ही हिंदू आहोत म्हणून त्याला विरोध करणे. कारण ते फादर आहेत तर त्याला काही अर्थ राहत नाही. त्यांची निवडप्रक्रिया चुकीची असती तर विरोध करणे समजू शकतो. पण तसे काही घडलेले नाही. संंमेलन आम्ही होऊ देणार नाही असे म्हणत असतील तर आत्तापर्यंत साहित्याबाहय लोकांनीच हैदोस घातला आहे. साहित्य संमेलनात बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करू नये आणि साहित्य संमेलन शांतपणे होऊ द्यावे.
----------------------------------------------------------------