खावटीचा लाभ बिगर आदिवासींना मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:09 AM2021-04-26T04:09:48+5:302021-04-26T04:09:48+5:30
बिगर आदिवासींमध्ये खुला वर्ग, इतर मागास प्रवर्ग, दलित समाज, पारंपरिक व्यवसाय करणारे कुंभार, सुतार, लोहार, न्हावी, मातंग, चर्मकार, भराडी ...
बिगर आदिवासींमध्ये खुला वर्ग, इतर मागास प्रवर्ग, दलित समाज, पारंपरिक व्यवसाय करणारे कुंभार, सुतार, लोहार, न्हावी, मातंग, चर्मकार, भराडी इत्यादी समाजाचा समावेश आहे. यातील बहुतेक कुटुंबही पारंपरिक व्यवसायावर व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी आहेत. त्यात बहुतेक लोक भूमिहीन असून पारंपरिक व्यवसाय मग वाजंत्री मंडळी, बँड पथक, झाडू बनविणारे, टोपल्या बनविणे असा व्यवसाय करतात. हे सगळे काम थांबले असून शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील आदिवासी भागात रहाणाऱ्या बिगर आदिवासी कुटुंबाना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर सामाजिक न्याय विभागाकडून खावटी अनुदान योजना सुरू करून सर्वांना समान न्याय द्यावा अशी मागणी युगप्रवर्तक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गौतम खरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.