Pune Ganpati: ना स्थायीची मान्यता; ना वॅर्क ऑर्डर, तरीही फिरत्या हौदाचे काम करण्याचे तोंडी आदेश
By राजू हिंगे | Published: September 21, 2023 10:18 AM2023-09-21T10:18:48+5:302023-09-21T10:19:15+5:30
अवघे तीन दिवस बाकी राहिले असताना संबंधित ठेकेदार काम कधी करणार? असा सवाल
पुणे: गेल्या वर्षी फिरत्या हौदातून गणेश विसर्जनाला मिळालेला कमी प्रतिसाद असतानाही पालिकेच्या प्रशासनाकडून गणेश विसर्जनासाठीच्या फिरत्या हौदांच्या दोन निविदा काढण्यात आल्या. या दोन्ही निविदासाठी स्वंयभु टॉन्सपोर्ट हे पात्र ठरले आहेत. अदयाप या निविदाची फाईल दक्षता विभागात आहे. या निविदांना स्थायी समितीची अदयाप मान्याता मिळालेली नाही. त्यामुळे या कामाची वॅर्क ऑर्डर ही काढण्यात आलेली नाही. अवघे तीन दिवस बाकी राहिले असताना संबंधित ठेकेदार काम कधी करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे महानगरपालिकेत ८ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नियोजनात फिरते १५० हौद असणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी तातडीने दीड कोटीची निविदा काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावर टीका झाल्यानंतरही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी फिरत्या हौदांचे समर्थन केले. त्यानुसार पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात या दोन्ही निविदासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट हे पात्र ठरले आहेत. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हौदांचे विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी दहा हौद असणार आहेत. या हौदांचे नियोजन हे क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी करणार आहेत.
दोन निविदा काढुनही एकाच ठेकेदाराला काम
फिरते हौदाच्या कामात समन्वय राहण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या. या दोन निविदाच्या कामासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट पात्र ठरले आहेत. त्यामुळे दोन निविदा काढुनही एकाच ठेकेदाराला काम मिळाले आहे. त्यामुळे दोन निविदा काढुन काय उपयोग झाला असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पाचव्या दिवसापासुन फिरते हौद उपलब्ध होणार , पण स्थायीची मान्यता कधी ?
गणेश विर्सजनाच्या पाचव्या दिवसापासुन फिरते हौद उपलब्ध होणार आहे. अवघे तीन दिवस बाकी राहिले असताना अदयाप या निविदाची फाईल दक्षता विभागात आहे. या निविदांना स्थायी समितीची अदयाप मान्याता मिळालेली नाही. त्यामुळे या कामाची वॅर्क ऑर्डर ही काढण्यात आलेली नाही. अवघे तीन दिवस बाकी राहिले असताना संबंधित ठेकेदारला वर्क ऑर्डर कधी देणार आणि तो तयारी करून काम कधी करणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एका हौदाला प्रतितास १ हजार ३१२ रूपये
पुणे महापालिकेच्या झोन क्रमांक १ , ३ आणि ४ च्या हददीमध्ये पाचवा, सहावा, सातवा, नउवा, दहावा आणि अकरावा दिवस ९० हौदासाठी ८५ लाख १ हजार ७६० रूपयांची निविदा तर झोन क्रमांक २ आणि ५ मध्ये याच दिवशी ६०हौदासाठी ५६ लाख ६७ हजार ८४० रूपयाची निविदा आहे. एका हौदाला प्रतितास १ हजार ३१२ रूपये दर निश्चित केला आहे. एका दिवशी एक हौद १२ तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.