सरसकट रिक्षा परवाना वाटप नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:11 AM2017-08-01T04:11:28+5:302017-08-01T04:11:28+5:30

कॅबमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला असताना, राज्य सरकारने रिक्षा परवाना खुला केला आहे.

Not allot a rickshaw license | सरसकट रिक्षा परवाना वाटप नको

सरसकट रिक्षा परवाना वाटप नको

Next

पुणे : कॅबमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला असताना, राज्य सरकारने रिक्षा परवाना खुला केला आहे. या निर्णयामुळे शहराच्या वाहतूककोंडीत भरच पडणार असून, या व्यवसायासमोरील अडचणीत आणखी वाढ होईल. त्यामुळे सरसकट सर्वांना परवाना न देता बेरोजगारांना तो देण्यात यावा, त्याबाबतचे निकष ठरवावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी येथे केली.
रिक्षाचालकांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) निदर्शने करण्यात आली. रिक्षा परवाना अर्ज आॅनलाइन भरण्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच बाहेर ही निदर्शने झाली. डॉ. आढाव म्हणाले, की रिक्षा हे सार्वजनिक प्रवासी वाहन आहे. ते चालवणाºया चालक आणि मालकाला अनेक प्रकारची बंधने आहेत. मागील दाराने आलेल्या कॉल अ कॅबला सरकारने मोकाट सोडले आहे. तर दुसरीकडे एकमेव संरक्षण कवच असलेले रिक्षा परवान्यांवरील नियंत्रणसुद्धा काढून घेतले आहे. आता अमर्याद परवाने वाटप करून रिक्षा व्यवसाय आणखी अडचणीत येणार आहे.
परवाना वाटप करताना लोकसंख्या, रस्ते, सध्याची उपलब्ध वाहन सुविधा यानुसार नवीन परवाना वाटपाचे सूत्र ठरविले गेले पाहिजे. अन्यथा त्यामुळे शहराच्या वाहतूककोंडीमध्ये भर पडेल. मागेल त्याला परवाना, असे न करता त्यासाठी निकष ठरवावे.
ज्याला नोकरी, व्यवसाय असेल त्याला परवाना देण्यात येऊ नये. त्यासाठी परवाना आधार
क्रमांकाशी जोडावा, असे डॉ. आढाव यांनी या वेळी स्पष्ट केले. डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांची भेट
घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन
दिले.

Web Title: Not allot a rickshaw license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.