अभिव्यक्तीची गळचेपी नको,संविधान बांधिलकी महोत्सव साजरा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:21 AM2017-11-21T01:21:10+5:302017-11-21T01:21:18+5:30

पुणे : न्यूड, एस. दुर्गा, दशक्रिया, पद्मावती आदी चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Not to be speechless, to embrace the constitutional commitment festival | अभिव्यक्तीची गळचेपी नको,संविधान बांधिलकी महोत्सव साजरा करणार

अभिव्यक्तीची गळचेपी नको,संविधान बांधिलकी महोत्सव साजरा करणार

Next

पुणे : न्यूड, एस. दुर्गा, दशक्रिया, पद्मावती आदी चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अस्मितेच्या आधारावर समाजकारण व राजकारण करू इच्छिणाºया संस्था, संघटना कलाकृती नाकारण्याची भूमिका घेत आहेत. चित्रपटांवर बंदी, आंदोलने यातून अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. विनयाने व्यक्त होण्याचे अंनिसने कायम स्वागत केले आहे. प्रश्न विचारणे, वाद-संवाद हे विकासाचे लक्षण आहे. मात्र, दडपशाहीने भारतीय परंपरेचा विचार संपवता येणार नाही. सरकार झोपले आहे का, असा सवाल करत अंनिस चित्रपटाच्या निर्माते, दिग्दर्शकांना विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणार असून, प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी जाहीर केले.
दुर्गा सिनेमातील स्त्रीच्या शरीराची उपभोगवस्तू म्हणून केल्या जाणाºया प्रदर्शनाच्या मुद्यावर, न्यूड सिनेमाच्या नावाबद्दल, दशक्रिया सिनेमातील ब्राह्मण्य व्यवस्थेच्या शोषणाबद्दल आणि पद्मावती सिनेमातील ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाच्या सादरीकरणाबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत. चित्रपट व्यवसायातील चांगल्या, वाईट घडामोडींचा प्रभाव समाजावर पडत असतो. त्यामुळे वर्तमान व भविष्यात चित्रपट माध्यम क्षेत्रातील संबंधितांचा आणि समाजातील इतर संबंधित घटकांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक निकोप, संवादी असणे आवश्यक वाटते, असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
‘सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतर समांतर सेन्सॉरशिप सुरू करणे चुकीचे आहे. याबाबीसाठी सर्व लेखक, कवी, चित्रकार व चित्रपट कलावंतांनी एकत्र येऊन त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागेल; तरच आपला आवाज व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्राण आहे. सत्तेचे राजकारण करण्यापेक्षा शासनाने हस्तक्षेप करून कारवाई केली पाहिजे.
अभिव्यक्तीची गळचेपी न करता लोकांना चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याच्या हेतूने अशा कलाकृती लोकांनी बघाव्यात यासाठी प्रचार मोहीम राबविणार आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
>संविधान बांधिलकी महोत्सवाचे दशक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे संविधान बांधिलकी महोत्सवाचे दशक साजरे केले जाणार आहे. २६ नोव्हेंबर संविधान स्वीकृती दिन ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनादरम्यान विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.
संविधान बांधिलकी महोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी संविधान अभिवादन फेरी, संविधान संवाद सभा, चालता बोलता संविधान, संविधान संकल्प सहचिंतन आणि संविधान सांस्कृतिक अभिव्यक्ती आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या निमित्ताने ‘भारतीय संविधानाचे अंतरंग’ ही पुस्तिका समितीतफें प्रकाशित केली जाणार आहे.

Web Title: Not to be speechless, to embrace the constitutional commitment festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.