‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ संबोधावे - विजयकुमार जैन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 02:00 AM2018-12-28T02:00:08+5:302018-12-28T02:00:53+5:30

महात्मा गांधी म्हणत, ज्या देशाला राष्ट्रभाषा नाही, तो देश मुका असतो. भारत विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात.

 Not 'India', but 'Bharat' should communicate - Vijaykumar Jain | ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ संबोधावे - विजयकुमार जैन

‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ संबोधावे - विजयकुमार जैन

Next

पुणे : महात्मा गांधी म्हणत, ज्या देशाला राष्ट्रभाषा नाही, तो देश मुका असतो. भारत विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. देशाचा राष्ट्रीय प्राणी, पक्षी आणि मुद्राही आहे. मग आपल्या देशाला राष्ट्रभाषा का असू नये? त्यामुळे भारताची संवैैधानिक राष्ट्रभाषा जाहीर व्हावी, हिंदीला राष्ट्रभाषेचा, तसेच प्रांतीय भाषांना राज्यभाषेचा दर्जा द्यावा आणि भारताला इंडिया नव्हे, तर भारत म्हणूनच संबोधावे, अशी मागणी अभियानाचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार व संपादक विजयकुमार जैन यांनी केली.
राष्ट्रभाषेच्या सन्मानासाठी ‘भारतीय भाषा अपनाओ अभियान’ अंतर्गत वरिष्ठ पत्रकार व संपादक विजयकुमार जैन यांच्या पुढाकारातून मुंबई येथून ही भाषा सन्मान यात्रा मंगळवारी सकाळी ६ वाजता निघाली. दि. ४ जानेवारीपर्यंत ही ‘भारतीय भाषा सन्मान यात्रा’ काढण्यात येणार आहे. भारतीय भाषा अपनाओ अभियानांतर्गत ५०० भारतीयांचे शिष्टमंडळ देशभर फिरून राष्ट्रभाषेसाठी जागृती करणार आहे. हे शिष्टमंडळ पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पुण्यातील नागरिक आणि पत्रकारांशी संवाद साधला.
या वेळी राष्ट्रीय भाषा समितीचे एम. एल. गुप्ता, अभियानाचे मुख्य संयोजक व ‘जितो’चे माजी अध्यक्ष विजय भंडारी, महावीर प्रतिष्ठानचे विजयकांत कोठारी, अभियानाचे समन्वयक डॉ. कल्याण गंगवाल, रमेश ओसवाल, ‘जितो’चे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, पूना मर्चंट चेंबरचे पोपटलाल ओस्तवाल, अरुण सिंघवी व अभय सेठिया, जितो व महावीर प्रतिष्ठानचे विश्वस्त
यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित
होते.

हिंदी दिवसाच्या पार्श्वभूमीवर ४ जानेवारी २०१९ रोजी हे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना निवेदन देणार आहे. भारतीय भाषांचा सन्मान वाढवावा, भारताची राष्ट्रभाषा असावी व भारताला इंडिया नव्हे, तर भारत संबोधावे, या मागण्यांचा समावेश आहे.
- डॉ. कल्याण गंगवाल

Web Title:  Not 'India', but 'Bharat' should communicate - Vijaykumar Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.