'माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या कुटुंबियांना...' एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 03:40 PM2022-07-08T15:40:52+5:302022-07-08T15:41:03+5:30
वानवडी पोलिसांकडून सराइतास अटक; हडपसर भागातील घटना
पुणे : एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण करुन स्वत:च्या घरात डांबून ठेवत, माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या कुटुंबियांना मारुन टाकू अशी धमकी देणा-या हडपसर येथील एका अठरा वर्षाच्या मुलाला वानवडीपोलिसांनी अटक केली.
याबाबत एका अल्पवयीन मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीवर देवकुळेचे एकतर्फी प्रेम आहे. तो तिचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. महिनाभरापूर्वी मुलीला शाळेजवळ अडवून माझ्याशी लग्न केले नाही तर आई-वडिलांना मारुन टाकेन. माझे मित्र गुंड आहेत, अशी धमकी त्याने दिली होती. त्यानंतर मुलगी घरात एकटी असताना देवकुळे घरात शिरला. तिला धमकावून घरातून बाहेर नेले. त्याने तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवले. त्याने तिला लग्न करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी देवकुळेला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.