पोलिस नव्हे देवदूत ; ८० वर्षांच्या वृद्धेसाठी पुण्याहून रोह्याला पोचवले औषध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 10:25 PM2020-04-03T22:25:35+5:302020-04-03T22:28:29+5:30

लॉक डाऊनच्या काळात कोकणातील रोहा येथे ८० वर्षाच्या वृद्ध महिलेसाठी अतिशय महत्वाचे असलेले औषध मिळत नव्हते. तेव्हा डेक्कन पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे थेट रोह्यामध्ये हे औषध पाठविणे शक्य झाले आहे.

Not the police but the angels; A medicine delivered from Pune to Rohi for a 80-year-old woman | पोलिस नव्हे देवदूत ; ८० वर्षांच्या वृद्धेसाठी पुण्याहून रोह्याला पोचवले औषध

पोलिस नव्हे देवदूत ; ८० वर्षांच्या वृद्धेसाठी पुण्याहून रोह्याला पोचवले औषध

Next

पुणे : लॉक डाऊनच्या काळात कोकणातील रोहा येथे ८० वर्षाच्या वृद्ध महिलेसाठी अतिशय महत्वाचे असलेले औषध मिळत नव्हते. तेव्हा डेक्कन पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे थेट रोह्यामध्ये हे औषध पाठविणे शक्य झाले आहे.

अशा कठीण प्रसंगी वेळेवर मदत केल्याबद्दल पुण्यातील चाटर्ड अकाऊंटंट अनिल धारप यांनी डेक्कन पोलिसांचे आभार मानले आहेत. धारप यांची आई सुधा धारप (वय ८०) या रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राहतात. त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आलेली औषधांचा साठा ८ दिवसाइतका होता, पण लॉक डाऊनमुळे रोहा येथे ही औषधे मिळत नव्हती. त्यामुळे ही औषधे रोहा येथे पोहचविण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती अनिल धारप यांनी डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना केली. त्यांनी तुम्हाला औषध देण्यासाठी पाठविणे शक्य होणार नाही. पण काय करता येईल, हे पहातो असे सांगितले. त्यानंतर लगड यांनी चौकशी केल्यावर पुण्यातील निरगुडकर यांना तातडीच्या कामासाठी महाड येथे जायचे होते. त्यांनी रोहा येथे धारप यांच्या आईची औषधे पोहचवायची या अटीवर त्यांना परवानगी देण्यात आली. धारप यांनी ही औषधे निरगुडकर यांच्याकडे सोपविली. त्यानंतर ती घेऊन निरगुडकर हे आज कोकणात गेले असून धारप यांच्या आईला पोहचवणार आहेत़ यामुळे धारप यांनी एकट्याने प्रवास करण्याचा प्रसंग टळला व त्यांच्या आईपर्यंतही आवश्यक ती औषधे पोहचणार असल्याने त्यांच्या जीवाचा धोकाही टळणार आहे.

Web Title: Not the police but the angels; A medicine delivered from Pune to Rohi for a 80-year-old woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.