आकस्मित मृत्यू नव्हे, घातपाताची शक्‍यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:25+5:302021-03-17T04:11:25+5:30

वाघोली : लोणिकंद पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी घातपाताचा आरोप केला आहे. याबाबत सखोल चौकशी करावी, ...

Not sudden death, but the possibility of assassination | आकस्मित मृत्यू नव्हे, घातपाताची शक्‍यता

आकस्मित मृत्यू नव्हे, घातपाताची शक्‍यता

googlenewsNext

वाघोली : लोणिकंद पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी घातपाताचा आरोप केला आहे. याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे.

याबाबतीत मिळालेल्या माहिती नुसार,वाघोली भावडी (ता.हवेली) येथील खाण क्रमांक 4 मध्ये परशुराम मदन जाधव (वय 28) रा:सुयोग नगर वाघोली यांचे सोमवारी(दि.15) उमेश बळीराम बन्सल(आग्रवाल)यांच्या मालकीचे पोकलंँड चालवीत असताना अपघाती निधन झाले. याबाबत लोणीकंद पोलिसांनी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद देखील केली होती.मात्र, मयत इसमाच्या नातेवाइकांना ह्या घटनेत घातपात असल्याचा संशय आल्याने त्यांनी शविच्छेदनानंतर मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याअगोदर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांची तक्रार पोलिसांनी न घेतल्याने नातेवाईक संतापले होते.

देशमुख यांनी सर्व हकीकत ऐकूण घेत लोणिकंद पोलिसांना गुन्हा दाखल करुन घेऊन तपास करण्याच्या सुचना दिल्या.

त्या नंतर पोलिसांनी मयत व्यक्तींच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवून घेत या प्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.

*************

संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी फोन करून सविस्तर माहिती दिल्यानंतर पोलिसांना याबाबत रितसर तक्रार दाखल करून घेऊन योग्य तो तपास करण्याच्या सूचना दिल्या.

- डॉ.अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक

Web Title: Not sudden death, but the possibility of assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.